मराठी भावगीत गान महर्षी-अरुण दाते-संधीकाली या अशा, धुंदल्या दिशा दिशा

Started by Atul Kaviraje, August 11, 2022, 08:08:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                मराठी भावगीत गान महर्षी
                                       "अरुण दाते"
                              -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     अरुण दाते (जन्म : ४ मे, इ.स. १९३४ -  ६ मे, इ.स. २०१८ ) हे एक मराठी भावगीत गायक होते. अरुण दातेंचे वडील रामूभैय्या दाते हे इंदूरमधील प्रतिष्ठेचे गायक होते. त्यांच्या इच्छेनुसार अरुण दाते गायक झाले. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे सुरुवातीला गाणे शिकले. त्यांनी पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. दाते यांनी मुंबईमध्ये कापड अभियांत्रिकीचा अभ्यास सुरू केला. अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षीच्या परीक्षेत अरुण दाते नापास झाल्यावर वडिलांनी त्यांना गाणे शिकण्याचे प्रोत्साहन दिले. अरुण दाते १९५५ पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. १९६२ मध्ये शुक्रतारा मंदवारा ह्या अरुण दाते यांच्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली. हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे त्यांना आग्रह करीत. आपण हिंदीभाषिक प्रदेशातील असल्याने आपले मराठी उच्चार शुद्ध नसल्याचे कारण सांगून दाते यांनी सुरुवातीला तीन वर्षे ते गाण्याचे टाळले. शेवटी एकदा ते ध्वनिमुद्रित झाले आणि अफाट गाजले. पुढे अरुण दाते आपल्या कार्यक्रमांतही 'शुक्र तारा' गाऊ लागले. वयाच्या पन्‍नाशीत त्यांनी भावगीतांवर आपले लक्ष केंद्रित केले इ.स. २०१०पर्यंत अरुण दाते यांचे शुक्रतारा या नावाने होणाऱ्या मराठी भावगीत गायनाचे २५००हून अधिक कार्यक्रम झाले. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक आल्बमही लोकप्रिय आहेत. मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायक या त्रिकुटाने मराठी भावगीताला परत लोकप्रियता प्राप्त करून दिली असे म्हणले जाते. अरुण दाते यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, कविता कृष्णमूर्ती, पुष्पा पागधरे यांबरोबर द्वंद्वगीते गायली आहेत. आज ऐकुया, श्री अरुण दाते यांच्या सुस्वरात "संधीकाली या अशा, धुंदल्या दिशा दिशा" हे सुप्रसिद्ध भाव-गीत.

                            "संधीकाली या अशा, धुंदल्या दिशा दिशा"
                           -------------------------------------

संधीकाली या अशा, संधीकाली या अशा
संधीकाली या अशा, धुंदल्या दिशा दिशा, चांद येइ अंबरी
चांदराती रम्य या, संगती सखी प्रिया, प्रीत होइ बावरी

मुग्ध तू नि मुग्ध मी, अबोल गोड संभ्रमी, एकरूप संगमी
रातराणीच्यामुळे, श्वास धुंद परिमळे, फुलत प्रीतिची फुले
प्रणयगीत हे असे, कानि ऐकू येतसे, गीती शब्द ना जरी

सांजरंगी रंगुनी, न कळताच दंगुनी, हृदयतार छेडुनी
युगुलगीत गाउनी, एकरूप हो‍उनी, देउ प्रीत दावुनी
प्रणयचित्र हे दिसे, रंगसंगती ठसे, कुंचला नसे जरी

================
गीतकार -गंगाधर महांबरे
संगीतकार -पं.हृदयनाथ मंगेशकर
गायक -लता मंगेशकर,अरुण दाते
================

                         (साभार आणि सौजन्य-सारेगामा मराठी)
                            (संदर्भ-मराठी सॉंग्स.नेटभेट.कॉम)
                        -----------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.08.2022-गुरुवार.