महाराष्ट्राचे गुणी संगीतकार व गायक-सुधीर फडके-धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना

Started by Atul Kaviraje, August 11, 2022, 08:15:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             महाराष्ट्राचे गुणी संगीतकार व गायक
                                       "सुधीर फडके"
                            -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके (जुलै २५, १९१९ − जुलै २९, २००२) हे महाराष्ट्रातील संगीतकार व गायक होते. बाबूजी या नावानेदेखील त्यांना ओळखले जाते. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीतआहे. फडके यांनी मराठी व्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपटांमध्येही गाणी गायली आणि संगीतबद्ध केली. फडके यांनी अनेक अजरामर गीते तयार केली आहेत. त्यांची अनेक भक्तीगीते, सुगम संगीत आणि चित्रपट गीते प्रचंड लोकप्रिय आहेत.
कवी ग.दि. माडगूळकर यांचे अजरामर गीतरामायण ही फडके यांच्या सर्वाधिक लोकप्रिय कामांपैकी एक आहे. हा कार्यक्रम आजही एवढा लोकप्रिय आहे की, या कार्यक्रमाच्या स्टेज परफॉर्मन्सला आजही प्रचंड गर्दी होते. फडके यांनी यातील सर्व ५६ गाणी संगीतबद्ध केली. कै. सुधीर फडके हे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त जवळजवळ ६० वर्षे होते. तसेच अमेरिकेमध्ये 'इंडिया हेरिटेज फाउंडेशन'च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती. आज ऐकुया, धाकटी बहीण या मराठी चित्रपटातील, श्री सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले आणि गायिलेले एक गाजलेले गीत.

                              "धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना"
                             --------------------------

धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
शब्दरूप आले मुक्या भावनांना

तुझ्या जीवनी नीतीची जाग आली
माळरानी या प्रीतीची बाग आली
सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा

तुझा शब्द की थेंब हा अमृताचा
तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा
उगा लाजण्याचा किती हा बहाणा

चिरंजीव होई कथा मिलनाची
तृषा वाढते तृप्त या लोचनांची
युगांचे मिळावे रूप या क्षणांना

===================
गीतकार : जगदीश  खेबुडकर
गायक : आशा  भोसले, सुधीर फडके
संगीतकार : सुधीर  फडके
मराठी चित्रपट : धाकटी बहीण (१९७०)
===================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-सारेगामा मराठी)
                    -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.08.2022-गुरुवार.