मराठी चित्रपट पार्श्वगायिका-उषा मंगेशकर-वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं

Started by Atul Kaviraje, August 11, 2022, 08:18:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  मराठी चित्रपट पार्श्वगायिका
                                       "उषा मंगेशकर"
                                 ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उषा मंगेशकर (१९३५ - हयात) या मराठी आणी गुजराती गायिका, संगीतकार आहेत. त्यांची आजी देवदासी व आजोबा ब्राह्मण होते. मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या त्या कन्या. ज्वानीच्या आगीची मशाल हाती, छबीदार छबी, लागली कुनाची उचकी ही चित्रपट गीते त्यांनी गायली आहेत. पंडित दीनानाथ मंगेशकर आणि शेवंती (शुधामती) यांची  ती सर्वात लहान मुलगी. लता मंगेशकर, आशा भोसले आणि मीना खडीकर यांच्यामधील ती सर्वात लहान बहीण आणि संगीत-दिग्दर्शक भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांची मोठी बहीण  आहेत. ऑलटाइम ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'जय संतोषी मां (1975)' साठी कमी बजेट असलेल्या चित्रपटासाठी काही भक्तीगीते गायल्यानंतर त्या  पार्श्वगायिका म्हणून चर्चेत आल्या. त्या चित्रपटातील त्यांच्या "मै तो  आरती" गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर बेस्ट फीमेल प्लेबॅक सिंगर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. २००६ मध्ये त्या चित्रपटाच्या रीमेकसाठी त्यांनी तीच गाणी गायली. उषा यांना चित्रकलेची आवड आहे. त्यांच्या "मुंगडा" या प्रसिद्ध गाण्यासाठी आणि पिंजरा या मराठी चित्रपटाच्या गाण्यांसाठी त्या प्रामुख्याने ओळखलया  जातात. त्यांनी दूरदर्शनसाठी 'फूलवंती' संगीत नाटकही तयार केले होते. आज ऐकुया, उषा मंगेशकर यांच्या आवाजात श्री दादा कोंडके यांचे एक गाजलेले गीत.

                         "वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं"
                        ----------------------------------------

जसं जीवात जीव घुटमळं
तसं पिरतीचं वाढतंय बळ
तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ गं
न हे बघून दुश्मन जळं
वर ढगाला लागली कळ
पाणी थेंब थेंब गळं

ढगाला लागली कळ
पाणी थेंब थेंब गळं

वर ढगाला लागली कळ
पाणी थेंब थेंब गळं

चल ग राणी गाऊया गाणी
फिरुया पाखरासंगं
रामाच्या पाऱ्यात गारगार वाऱ्यात
अंगाला भिडू दे अंग
हे जवा तुझं नि माझं जुळं
पाणी थेंब थेंब गळं
(कोरस)

सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा
कुठं हा घेऊन जावा
काय बाय अकरित झालंय विपरित
सशाला वाट कूणी दावा
माझ्या पदरात पडलंय खूळं
पाणी थेंब थेंब गळं
(कोरस)

जमीन आपली उन्हानं तापली
लाल लाल झालीया माती
करूया काम अन् गाळूया घाम
चला पिकवू माणिक मोती
एका वर्सात होईल तीळं
पाणी थेंब थेंब गळं
(कोरस)

शिवार फूलतय तोऱ्यात डूलतय
झोक्यात नाचतोय धोतरा
तूरीच्या शेंगा दावत्यात ठेंगा
लपलाय भुईमूग भितरा
मधी वाटाणा बघ वळवळं
पाणी थेंब थेंब गळं
(कोरस)

झाडावर बुलबुल बोलत्यात गुलगुल
वराडतिया कोकिळा
चिमणी झुरते उगीच राघू मैने वरती खुळा
मोर लांडोरी संगं खेळं
पाणी थेंब थेंब गळं
(कोरस)

थूईथूई नाचतय खुशीत हसतय
मनात फुलपाखरू
सोडा की राया नाजूक काया
नका गुदगुल्या करु
तू दमयंती मी नळ
पाणी थेंब थेंब गळं
(कोरस)

बामनाच्या मळ्यात कमळाच्या तळ्यात
येशिल का संध्याकाळी
जाऊ दुसरीकडं नग बाबा तिकडं
बसलाय संतू माळी
म्हाताऱ्याला त्या लागलाय चळं
पाणी थेंब थेंब गळं
(कोरस)

आलोय फर्मात पडलोय पिर्मात
सांग मी दिसतोय कसा?
सांगू?आडानी ठोकळा मनाचा मोकळा
पांडू हवालदार जसा
तुझ्या वाचून जीव तळमळं
पाणी थेंब थेंब गळं
(कोरस)

=================
चित्रपट:बोट लावीन तिथं गुदगुल्या
गीत: दादा कोंडके
स्वर: महेंद्र कपूर व उषा मंगेशकर
=================

                        (साभार आणि सौजन्य-सारेगामा मराठी)
                                 (संदर्भ-एस.मुळे.कॉम)
                       -----------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.08.2022-गुरुवार.