मराठी चित्रपट गाणी-देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच न्हाई

Started by Atul Kaviraje, August 13, 2022, 08:43:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "मराठी चित्रपट गाणी"
                                   -------------------
 
मित्र/मैत्रिणींनो,

     मराठी चित्रपट गाणी, या विषया-अंतर्गत आज ऐकुया, दुनियादारी चित्रपटातील अतिशय गाजलेले गीत. 

                            "देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच न्हाई"
                           ---------------------------------

देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच न्हाई
सांग कुठं ठेवू माथा? कळंनाच काही

देवा कुठं शोधू तुला? मला सांग ना
प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जिवाची आग लागुदे तुझ्या उरी

आरपार काळजात का दिलास घाव तू ?
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू

का? कधी? कुठे? स्वप्‍न विरले प्रेम हरले
स्वप्‍न माझे आज नव्याने खुलले
अर्थ सारे स्पर्शांने उलगडले

आरपार काळजात का दिलास घाव तू ?
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जिवाची आग लागुदे तुझ्या उरी

का रे ? तडफड ही ह्या काळजामधी
घुसमट तुझी रे होते का कधी ?
मानसाचा तू जल्म घे
डाव जो मांडला मोडू दे

का हात सुटले? श्वास मिटले ठेच लागे
उत्तरांना प्रश्‍न कसे हे पडले
अंतरांचे अंतर कसे ना कळले

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जिवाची आग लागुदे तुझ्या उरी

आरपार काळजात का दिलास घाव तू ?
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू

==================
गीत – मंदार चोळकर
संगीत – अमितराज
स्वर – आदर्श शिंदे,कीर्ती किल्लेदार,
          आनंदी जोशी
चित्रपट – दुनियादारी
==================

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी प्लॅनेट.कॉ.इन)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.08.2022-शनिवार.