मराठी चित्रपट-चंद्रमुखी-सवाल-जवाब गीत

Started by Atul Kaviraje, August 13, 2022, 08:57:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, सध्या गाजत असलेला सुप्रसिद्ध मराठी चित्रपट "चंद्रमुखी", या चित्रपटातील एक सवाल-जवाब गीत.

     Sawal Jawab Lyrics in Marathi: This song is sung by Madhura Datar, Priyanka Barve, and Vishvajeet Borvankar.Sawal Jawab Song's lyrics were written by Guru Thakur and music composed by Ajay-Atul.

सवाल – 1

अहो नर नारीचे मिलन घडता
जीव नवा ये जन्माला

अहो नर नारीचे मिलन घडता
जीव नवा ये जन्माला
तिन्हीत्रिकाळी सत्य असे हे
ठाऊक अवघ्या जगताला
(जी ई ई, जी ई ई, जी ई ई, जी)

अगं सांग तू ऐशा मिलनाविना
जन्म कुणाचा झाला गं
अन कुणा नारीनं कसा अन कधी
चमत्कार हा केला गं
(जी ई ई ई ई – जी र जी X2
दाजी जी र जी र हे जी)

"काय चंद्राबाई हाये का जवाब
नैनाबाई हाये की जवाब, ऐका"

जवाब – 1

अहो नसे नारी ती ऐरी गैरी
आदीशक्ती ह्या जगती गं
(आदीशक्ती ह्या जगती गं)
सांब शिवाची अर्धांगी
तीज माय पार्वती म्हणती गं
(जी ई ई, जी ई ई, जी ई ई, जी)

अहो अंग मळातून बालक रचिला
चमत्कार तो गणपती
अन त्याच गणाची आज थोरवी
कार्यारंभी गाती गं
(आ.. जी र जी, आ.. जी र जी
दाजी जी र जी र हे जी)

"काय नैनाबाई कसा वाटला जवाब
आता आम्ही टाकू का सवाल
बघा जमतयं का? ऐका"

सवाल – 2

सदैव असते सख्या संग जरी
बिलगून त्याला राही गं
अंधाराचं बोट धरूनी
कुणा भेटण्या जाई गं

अवं देती दुनिया तरी दाखला
या दोघांच्या पिरतीचा
(या दोघांच्या पिरतीचा)
अंधाराचं गुपित सांग तू
सवाल करते नीतीचा
(जी ई ई, जी ई ई, जी ई ई, जी)

जवाब – 2

सोबत असते तरी न दिसते
गोष्ट ही न्याऱ्या ढंगाची
अंधारी त्या विरुन जाते
सखी सावळ्या रंगाची

हे युगायुगांचे सत्य असे ही
सखी सख्या विन नसते गं
(सखी सख्या विन नसते गं)
शरीर म्हणजे सखा तयाची
सखी सावली असते गं
(गं.. जी र र, गं.. जी र र
दाजी जी र जी र हे
जी र जी र हे
जी र जी र हे जी)

"मायबाप आज हिराबाईंचा सत्कार हाये
मी त्यांसनी पदर पसरून विनंती करते
की त्यांनी ह्या मंचावर आमसनी बी देवाच दर्शन घडवांव"

सवाल – 3

अगं आभाळाहून विशाल भारी
कधी लोण्याहून मऊ सुत गं, हे.. !

अगं आभाळाहून विशाल भारी
कधी लोण्याहून मऊ सुत गं
फिक्की पडती चंदनकाडी
झिजनं‌ त्याचं अद्भुत गं
(जी ई ई, जी ई ई, जी ई ई, जी)

अगं डोईवरली होई सावली
कधी पाठीचा ताठ कना
कधी प्रसंगी तांडव करुनी
होई भोळा सांब पुन्हा
(जी ई ई, जी ई ई, जी ई ई, जी)

देव दानवांनाही होता
प्रत्येकाला असतो गं
नकोस शोधू पुराण पोथ्या
घराघरातून दिसतो गं
(आ.. जी र र, आ.. जी र र
दाजी जी र जी र हे
जी र जी र हे जी)

जवाब – 3

किती वर्णू गं महिमा त्याचा
त्याच्या पायी घडले गं
हरवून जाता त्याची सावली
जगी एकटी पडले गं

लयमोलाचा ऐवज असतो
पुन्हा कधी ना मिळतो गं
(पुन्हा कधी ना मिळतो गं)
उमगायाला सोपी आई
बाप कुणा ना कळतो गं
(बाप कुणा ना कळतो गं)

जन्म घेई जे त्या साऱ्यावर
त्याच्या गुनांची छाप दिसे
(त्याच्या गुनांची छाप दिसे)
सवाल होता फक्कड ज्याचा
जवाब केवळ बाप असे
(आ.. जी र र, आ.. जी र र
दाजी जी र जी र हे
जी र जी र हे
जी र जी र हे जी)

=================
गीत : सवाल  जवाब-मराठी
गायक :मधुरा दातार, प्रियांका बर्वे,
           विश्वजीत  बोरवणकर
संगीतकार : अजय -अतुल
गीतकार : गुरु  ठाकूर
=================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी लेख.कॉम)
                    -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.08.2022-शनिवार.