पतेती पारशी सण नवीन वर्ष-क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, August 14, 2022, 08:30:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "पतेती पारशी सण नवीन वर्ष"
                                           क्रमांक-१
                                --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      पतेती, हा पारशी बांधवांचा नववर्ष दिवस. त्यानिमित्ताने या अग्निपूजक शांतीप्रिय ख-याखु-या अल्पसंख्य समाजाच्या बहुआयामी वैशिष्ट्यांची ओळख करून घेवूया.

      पतेती.... पतेती म्हणजे पारशी लोकांच्या नवीन वर्षाची सुरुवात. पारशी वर्षारंभ दिनाला 'नवरोज' म्हणतात.

     पारशी नूतन वर्षाचा प्रारंभ 'फरवर्दीन' मासाने होतो. तत्पूर्वी आज पारशी वर्षाचा अखेरचा दिवस 'पतेती' म्हणून साजरा केला जातो.

     वर्षभरात पतेती, नवरोज व चैत्रात जमशेदजी नवरोज हे तीन सण साजरे केले जातात
नवरोजला नव्या वर्षाच्या प्रारंभानिमित्त मंगलमय वातावरणात सकाळी अग्यारीत अग्नीची पूजा केली जाते. पंचमहाभूतांची देखील पूजा होते.

     पारशी समाजाचे दैवत म्हणजे 'अग्निदेव' व धर्मसंस्थापक झरतुष्ट्र हे होत.

     चैत्रातला जमशेदजी नवरोज हा 'चैत्रगौरी'प्रमाणे साजरा केला जातो.

     पारशी वर्षाचे शेवटचे दहा दिवस हे पितृपक्षाप्रमाणे पितरशांतीकरिता पाळले जातात.

     या दहा दिवसांत प्रत्येक पारशी कुटुंबाकडून पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून फुले किंवा फुलदाणी वाहिली जाते.

     गेलेल्या वर्षात काय केले, याचा आढावा घेत, नवीन वर्षासाठी शुभसंकल्प करावा अशी अपेक्षा असते

     आजच्या दिवशी शेवया, शिरा, मिष्ठान्न व विशेषत: गोड दही आदी पदार्थ बनविले जातात.

     सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करून नवे कपडे परिधान केले जातात.

     यावर्षी शुक्रवारपासून पारशी नववर्षाचा पहिला फरवर्दिन महिना सुरू होऊन नूतन वर्ष सन १३८७ प्रारंभ झाला.

     हा समाज भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फक्त ०.००७% असला तरी त्यांची कामगिरी मात्र उल्लेखनीय आहे. स्वातंत्र्यलढय़ामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीमध्ये पारसी समाजाचे योगदान मोलाचे आहे. इस्रायल कॅलेंडर प्रमाणे वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला'नवरोज' म्हटले जाते. ह्या दिवशी अग्यारीत जाऊन प्रार्थना म्हटल्या जातात आणि खास पारशी भोजनाचा आस्वाद घेतला जातो.

                  पारसी समुदायाची ओळख----

     पारसी लोकांचे पूर्वज प्राचीन इराणी लोक हे इंडो-युरोपिअन भाषिक समूहाच्या इंडो-इराणीयन शाखेचा एक भाग होते आणि प्राचीन इंडो-आर्यन (वैदिक आर्य) लोकांशी त्यांचा अगदी जवळचा संबंध होता.पारसी लोक हे सामान्यत: उंच, गोरे, बळकट बांध्याचे, मोठे कपाळ, सरळ व मोठे नाक, मोठे डोळे असे दिसतात.

                       पारसी खाना----

     पारशी लोकांचे पदार्थ आवडीने हॉटेल्स मधून खाल्ले जातात. पारसी खान्यात मुख्य भात आणि घट्ट डाळीचा समावेश आहे. पारशी लोकं मांसाहाराचा वापरही मोठ्या प्रमाणात करतात. अंडी आणि अंडयाचे पदार्थ हे त्यांच्या नाश्यात असतात. स्क्रॅम्ब्ल्ड एग, पारसी आकूरी, पोरो हे काही लोकप्रिय पदार्थ. गोडात त्यांना शिरा, शेवया, फालूदा, कूल्फी अधिक आवडतात.

                           पारशी विवाह----

      पारश्यांसाठी विवाह संस्था अतिशय महत्त्वाची असून लग्न गाठी देवानेच बांधलेल्या असतात असा त्यांचा समज आहे. विवाहासाठीचा त्यांचा पारशी लग्न आणि फारकतीचा कायदा आहे. विवाहाच्या आधी दोन्ही घरात दिवे लावले जातात. त्यांनंतर दोन्हीकडचे व्याही एकमेकांना भेटायला जातात तेव्हा चांदीची नाणी शकून म्हणून देतात. विवाहचा पोशाख पांढरा असून, विधी दरम्यान कूंकू लावणे, मॉंग भरणे, अक्षदा आणि ओटी भरणे प्रथा आहेत.

                           पारशी अंत्यविधी----

     पारशी अंत्यविधी इतर धर्मांपेक्षा वेगळा असल्यामुळे कायमच कुतूहलाचा विषय राहिला आहे. त्यांच्यात मृतदेहाचा संपूर्ण नाश स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाते. एखादी व्यक्ती मृत झाल्यावर तिला स्पर्श करण्यास बाकीच्यांना मनाई करण्यात येते. मृतदेहाला स्नान घालून पांढरे वस्त्र परिधान करण्यात येते. पारंपारिक धार्मिक मंत्र म्हणून झाल्यावर मृतदेहाला पारशी स्मशान किंवा विहीरीपाशी नेण्यात येते. तेथे मृतदेहाचे संपूर्ण वस्त्र काढण्यात येतात व मृतदेहाला पक्षी व प्राण्यांनी भक्षण करण्याकरिता सोडून देण्यात येते. घर संपूर्ण गोमूत्राने साफ करुन, पवित्र धूप, दिप लावला जातो व मृतातम्यास शांती वाहिली जाते.

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-सूत्रसंचालन.कॉम)
                   -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.08.2022-रविवार.