छिन्न विच्छिन्न

Started by @गोविंदराज@, August 15, 2022, 12:03:52 PM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

छिन्न विच्छिन्न अशी मनाची अवस्था
सांगताही येत नाही कुठे हि व्यथा ...

अहोरात्र डोक्यात विचारांचा पाढा
सुटण्या ऐवजी वाढत चाललाय तिढा ...

व्यक्त होण्याचीही आता माझ्यात हिम्मत नाही
माझ्या नजरेत आता मला किंमत नाही ...

आयुष्य कस कुठे भरकटत चाललय
पाला पाचोळ्यागत फरफटत चाललय ...

चूक कुणाची , कोण बरोबर ?
श्वास अडखळत चाललाय खरोखर ...

गोविंदराज
१५.०८.२०२२