मातीतील अक्षरे ??

Started by Ashok_rokade24, August 15, 2022, 04:30:39 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

कुणा जवळ व्यक्त व्हावे ,
कुणी न राहती साथीला ,
मातीत ऊमटती अक्षरे ,
एकांत ऊरला साक्षीला ॥

स्वार्थाचे जंगल माजले ,
हर जीव इथे भुकेला ,
वाणीत जहर भरले ,
डोळ्यात अंगार फुलला ॥

वाहता हे ओझे दुजांचे ,
कणाही पाठीचा झिजला ,
आधाराची वाट पाहता ,
नकळत सुर्यास्त झाला  ॥

मुखवट्यात माणसाचा  ,
स्वार्थ न कधीच दिसला ,
आपले म्हणून जे आले ,
त्यांनीच डाव हा साधला ॥

अशोक मु.रोकडे .
मुंबई.