मला आवडलेला निबंध-डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती-अ

Started by Atul Kaviraje, August 15, 2022, 08:26:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "मला आवडलेला निबंध"
                                   ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     "मला आवडलेला निबंध". या लेख मालिके-अंतर्गत आज वाचूया, एक महत्त्वाचा निबंध. या निबंधIचा विषय आहे- "डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती"

विषय : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती----
---------------------------------------

     भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतावर ब्रिटिश राज्य करत होते. सारी जनता ब्रिटिशांपुढे हतबल झाली होती तरी अशा परिस्थितीतही काही लोक धैर्याने ब्रिटिशांना लढा देण्यास उभे राहिले आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा हुतात्म्यांचा नावे भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरली गेलेली आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि भारताला एक स्वतंत्र देश म्हणून आपल्या पायावर उभे रहाण्यात खूप लोकांनी मोलाचा वाटा आहे आणि अशाच काही थोर व्यक्तींपैकी एक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते.

     १४ एप्रिल हा दिवस बाबासाहेबांचा जन्मदिवस. हा दिवस संपूर्ण भारतात बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला भीमजयंती म्हणून हि ओळखले जाते. बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या निमित्ताने शाळांमध्ये आनंद महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनावर निबंध, भाषण, जीवन चरित्र, जीवन परिचय, लिहिण्यास सांगितले जाते. म्हणूनच या लेखामध्ये आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनातील सर्व माहिती मराठी भाषेमध्ये दिली आहे. ह्या लेखामध्ये तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण, कुटुंब, शिक्षण, त्यांचे समाजकार्य, त्यांचे सुविचार, विचार, त्यांनी लिहिलेली पुस्तके यांबद्दल माहिती मिळेल. हि माहिती तुम्हला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर निबंध, भाषण, परिच्छेद लिहिण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

     बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर समाजसुधारक होते त्याच बरोबर ते एक नेते, अर्थतज्ज्ञ, आणि उत्कृष्ट कायदेपंडित होते. बाबासाहेब आंबेडकर सदैव दलितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांना समाजामध्ये समान न्याय आणि वागणूक मिळवून देण्यासाठी झटत राहिले. त्यांचे संपूर्ण आयुष्य हा जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्धचा लढाच म्हणावं लागेल.

     बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू (जे आता मध्यप्रदेश मध्ये आहे) येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म एका गरीब दलित कुटुंबात झाला होता. त्यावेळी दलितांना समाजामध्ये अमानुष वागणूक मिळत असे व खूप भेदभाव केला जाई. दलित मुलांना शाळेत प्रवेश होते पण त्यांना वेगळे बसवण्यात येई आणि त्याचबरोबर त्यांना बसण्यासाठी घरून स्वतःचे गोणपाट आणावे लागत असे. त्यांना पाण्याच्या भांड्यांना हात लावण्याची परवानगी नव्हती. शाळेतील शिपाई उंचावरून त्यांच्या हातावर पाणी ओतायचे. आणि जेव्हा योनी शिपाई नसेल तेव्हा त्यांना तसेच तहानलेले राहावे लागत असे. बाबासाहेब आंबेडकर अशाच विद्यार्थ्यांपैकी एक होते. त्यांनी ह्या सर्व गोष्टींना तोंड देत आपले शिक्षण पूर्ण केले.

--लेखिका-पूजा शिंदे
------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीलेख.कॉम)
                    -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2022-सोमवार.