आरोग्यदायी फळे-आंबा

Started by Atul Kaviraje, August 16, 2022, 07:45:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "आरोग्यदायी फळे"
                                    -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आरोग्यदायी फळे या विषया-अंतर्गत आज वाचूया पुढील लेख-

     आंबा - Mango Eating Benefits--

– आंबा हा फळांचा राजा तो फक्त वैशाख व ज्येष्ठ महिन्यातच खावा, असे आयुर्वेदाच्या अभ्यासकांचे सांगणे आहे.

– हे फळ शक्तिवर्धक आहे.

– अन्नाबद्दल रूचि उत्पन्न करणे व भूक वाढविणे हे त्याचे प्रमुख गुण होत तसेच शरीराची आग होत असल्यास आंबा उपयुक्त ठरतो.

– उन्हाळ्यात आंबा खाणे योग्य आहे.

– अतिसार म्हणजे वारंवार शौचास होणे. या व्याधीवर आंब्याची साल व कोय उपयुक्त आहे.

– साल ठेवून तिचा काढा तयार करून घेतात. तसेच कोय भाजून तिचे चूर्ण करून मधातून दिल्यास विशेषतः लहान मुलांचा अतिसर दूर होतो.

--प्राची म्हात्रे
-----------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हेल्थ.मराठीवारसा.कॉम)
                  ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.08.2022-मंगळवार.