II निबंध-लेखमाला II-(निबंध क्रमांक-3)-वर्षा सहल, वनविहारातील मौज

Started by Atul Kaviraje, August 17, 2022, 08:38:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II निबंध-लेखमाला II
                                  --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आजपासून, निबंध-लेखमाला सुरु करीत आहे, निबंध-लेखमाला या मथळयI-अंतर्गत, शैक्षणिक निबंध सादर करीत आहे, (निबंध क्रमांक-3), आजच्या निबंधाचे शीर्षक आहे- "वर्षा सहल, वनविहारातील मौज"

निबंध  विषय---
-----------
2) वर्षा सहल, वनविहारातील मौज
   ----------------------------
निबंध • शैक्षणिक
----------------

     आजकाल सिमेंटच्या या जंगलातून आत्ताच्या पिढीला वन, अभयारण्ये यांची माहिती व्हावी म्हणून बहुतेक शाळा वर्षा सहल साठी नेतात. अशा या वनांची तसेच अभयारण्यांची आजकालच्या पिढीला तसेच या पुढील नवीन पिढीला माहिती व्हावी. म्हणून आपण सर्वांनी या वनांचे जतन केले पाहिजे. आणि या सर्व मुलांना त्यांची माहिती दिली पाहिजे. म्हणूनच आम्ही ह्या पोस्ट मध्ये वर्षा सहल, वनविहाराची मौज या विषयावर माहिती, कथनात्मक निबंध, भाषण, लेख लिहला आहे.

     वर्षा सहल, वनविहार म्हटलं की आपल्याला आठवते ते घनदाट जंगल, प्राणी, पक्षी आणि तलाव. वनविहार करायला सर्वांनाच आवडते. खरेतर सर्वांनीच आपल्या आयुष्यात एकदातरी वर्षा सहल, वनविहार करायला पाहिजे. म्हणजेच आपल्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला एक छोटासा ब्रेक मिळेल आणि मन शांत होईल.

     नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली होती. आम्ही सर्व मित्र मैत्रिणी माझ्या घरी भेटलो. आम्हा मित्रांना कल्पना सुचत होत्या. आम्ही सर्वांनी जवळच असलेल्या नान्नज येथील अभयारण्यात वर्षा सहल आणि वन विहारासाठी जाण्याचे ठरवले. दुसरे दिवशी सकाळी धुंद अशा वातावरणात आम्ही ट्रॅक्सने निघालो. गावापासून दूर, मुक्त वातावरणात आम्हाला कशाचाच अटकाव नव्हता. अर्ध्या पाऊण तासातच आम्ही नान्नजला पोहोचलो आणि सर्वजण जणू जागेवरच उडू लागलो, कारण सर्व परिसरच रमणीय होता. जेथे बघावे तिकडे हिरवेगार. आम्ही तिकीट काढून आत प्रवेश करतो न करतो तोच माझ्या मित्राचा खाण्याचा डबा पळवला गेला व आम्ही एकमेकांशी भांडू लागलो.

     तेवढ्यात 'हूप हूप' करत, नाक खाजवत बसलेल्या लाल तोंड असणाऱ्या माकडाने आमचे लक्ष वेधून घेतले. ते माकड आरामात झाडावर बसून खात होते व अशा प्रकारे आमचे स्वागत झाले. थोडे पुढे गेल्यावर आम्हाला एक तलाव लागला. मग काय आम्ही शांत राहतो. भराभर पाण्यात उड्या टाकल्या. मनसोक्तपणे पोहणे झाल्यावर भोजनाचा आनंद लुटला. वनात तर झाडच. दाट झाडी असल्यामुळे उन्हाचा काही प्रश्नच नव्हता, त्यामुळे आम्ही बिनधास्त हिंडत होतो. मधूनच एखादा हरणांचा कळप पळत जाई.

     माझे मन तर त्याहीपेक्षा जोरात दौडत होते. आम्ही ज्या वनात आलो होतो, ते ठिकाण 'माळढोक' पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु आम्ही हिंड हिंड हिंडलो तरी आम्हाला त्याचे दर्शन झाले नाही. शेवटी आम्ही वनाधिकाराच्या रेस्टहाऊसवर चहा घेतला व परत हिंडायला निघालो. आज आम्हांला मित्र मैत्रिणींना वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी पाहायला मिळत होते. शेवटी एका आवाजाने आमचे लक्ष वेधून घेतले. अरे हा तर माळढोक पक्षी. आमच्या योजनेचे सार्थक झाले.

     तेथे आम्हाला फिरत असताना अजून एक तलाव पाहायला मिळाला. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे, कासव होते. या तलावाजवळच बराच वेळ आम्ही सर्वजण मिळून गप्पा गोष्टी करत बसलो. कारण मस्त असा वाऱ्याचा आवाज, निरव शांतता अशा या वातावरणात खूप मस्त वाटत होते. संध्याकाळ होत आली होती. आम्ही रात्री मुक्काम करण्याचे ठरवले. रात्रीची शांतता, मधूनच पक्षी प्राण्यांचा कर्णकर्कश आवाज घाबरवून सोडत होता. काजव्यांचा प्रकाश लुकलुकत होता. आम्ही सर्वांनी काजवे पकडून स्वतःची बॅटरी तयार केली व परत हिंडण्यास निघालो.

     चांदणे, रातकिड्यांचा आवाज, घनदाट झाडी सर्व काही औरच होते. परंतु अशा फिरण्यातूनच एकमेकांशी मैत्री, धाडस, नेत्रित्व अशा गुणांना वाव मिळतो. दुपारी तोडलेले पेरू, बोरे यांची खादंती चालूच होती. पण आता पोटात कावकाव होत होती. शेवटी आम्ही शेकोटी पेटवून गाणी, नाच करत जेवणाचा आनंद घेतला व निसर्गाच्या साथीने झोपी गेलो. मराठी निबंधाचे प्रकार, निबंध कसा लिहावा, कसा असावा?

     दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकरच उठून पुन्हा भटकंतीसाठी निघालो. तलावाच्या किनारी जाऊन आम्ही मासे पकडण्याचा आनंद घेतला. फिरताना आम्हाला तेथे वडाचे झाड दिसले त्यावर आम्ही झोके घेतले. मग दुपारी आम्ही सर्वांनी मिळून चुलीवरती मसाले भात बनवून खाल्ला. भात आम्ही पहिल्यांदाच केल्यामुळे थोडा बेचव झाला होता पण निसर्गाच्या सानिध्यात आम्हाला तो मस्त लागला आणि त्यात तो आम्ही केला होता त्यामुळे त्याचे कौतुकही होतेच.

लेखक-अजय चव्हाण
------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कॅम्पस जुगाड.कॉम)
                  --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.08.2022-बुधवार.