दोन अश्रू

Started by mkapale, August 19, 2022, 08:53:01 AM

Previous topic - Next topic

mkapale

तुझ्या मनातली हुरहूर आणि माझ्या डोक्यातलं काहूर
दोन अश्रू ओघळलेले आठवणींचे आणि मन होते आतुर

जितकं दूर जाऊ म्हणावं तितकं बंधन घट्ट होत जातंय
हात अंतरले तरीही स्पर्श तुझा आहे मनात अखंड साठून

साद घातली कळवळीने , आवाज केवळ घुमतोय मनात
तुझ्याकडे पोहोचायचा, बोगदाच वीरलाय धुकं दाटून

दोन जीव, दोन विश्व, दोन धागे थांबलेले दिशाहीन
गाठी नात्यांच्या जुळतील कधी, प्रश्न राहिला रेंगाळून

आवर मना त्या चातकाला, नाही पाऊस केवळ दोन आसू
रंगल्या मैफिलीची त्या, राहिली धून हवेत विखरून...राहिली धून हवेत विखरून