भटकंती-बहरीन–मध्यपुर्वेच्या वाळवंटातील मृगजळ

Started by Atul Kaviraje, August 22, 2022, 07:54:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "भटकंती"
                                       ----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री ब्रिजेश मराठे, यांच्या ब्लॉग मधील एक सदर "भटकंती", मधील महत्त्वपूर्ण लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "बहरीन – मध्यपुर्वेच्या वाळवंटातील मृगजळ"

          बहरीन – मध्यपुर्वेच्या वाळवंटातील मृगजळ--

     व्यावसाइक कामानिमीत्त मध्यपुर्वेत, सौदी अरेबीया, रियाधला जाण्याचा योग आला.  मध्यपुर्वेत जाण्याची ही पहिलीच खेप. थोडीफार उत्सुकता होती या प्रवासाची. पण येण्यापुर्वी गुगलींग केल्यावर फारच निराशा झाली. सौदी अरेबीया, ज्या देशात मुस्लीम बांधवांची मक्का आणि मदीना ही पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत, हा देश पुर्णपणॆ कुराण्यातल्या 'शरिया' तत्वांवर चालतो. शरियाच्या पुर्ण कलमांचे (कायदे) काटेकोर पालन केले जाते. गैर मुस्लीमांसाठी जाचक असे खालील मुद्दे

1. सर्व स्त्रियांनी बुरखा (अबाया) घालणे अनिर्वार्य. (हा कायदा धर्मातीत आहे)
2. सार्वजनीक ठिकाणी स्त्री आणि पुरुष  एकत्र येणे निषिद्ध
3. स्त्रियांना सार्वजनिक ठिकाणी जाताना पुरुषाबरोबर (पती अथवा वडील) असणे बंधंकारक
4. जगातील एकमेक देश जिथे मुव्ही थिएटरवर कायद्याने बंदी
5. दारू पिणॆ / बाळगणॆ कायद्यानुसार निषिद्ध (पकडले गेल्यास शिक्षा भय़ंकर)
6. 5 वेळॆच्या नमाजच्या वेळी दुकाने / मॉल्स  कायद्यानुसार बंद
7. मुतव्वा हे धार्मिक पोलिस नमाजच्या वेळी बाहेर फिरणार्‍या कोणालाही पकडून मशिदीमधे घेउन जाउ शकतात
(माझ्या  एका मित्राला नेले होते, बिचारा सांगुन सांगुन थकला कि तो मुस्लीम नाहीयेय 😦 )

     पहिल्या 4 गोष्टींवर आणि शेवट्च्या 2 गोष्टींवर मला जास्त काही  हरकत नव्हती /  नाहीयेय, पण नंबर पाच हा मुद्दा माझ्यासाठी फारच जाचक होता. कसे होणार ह्या विवंचनेत असतनाच कळले की माझा व्हिसा ज्या प्रकारचा होता त्याने मी फक्त एक महीना सौदी अरेबीया, रियाध राहु शकतो. एका महिन्यानंतर व्हिसा एक्सटेंशन साठी सौदीबाहेर जाउन येणे बंधंकारक होते.  बहरीन हा एक शेजारी देश जिथे प्रवेशतत्वावर 72 तासांचा व्हिसा मिळतो, तिथे व्हिसा एक्सटेंशन दर एका महिन्यानंतर जावे लागणार होते. मग बहरीन वर गुगलींग करणॆ आलेच. ते केल्यावर जे कळले त्याने आनंद गगनात मावेना.

     बहरीन हा मुस्लीम देश असुनही पुर्ण मुक्त देश आहे. मेट्रोपोलीटन संस्कृती आपलीशी केलेला एक सुंदर देश. महत्वाचे म्हणजे सौदीतल्या पाचव्या मुद्याला फाटयावर मारणारा देश. मला तर तो मध्यपुर्वेच्या वाळवंटातील मृगजळाप्रमाणे भासला 🙂

     सौदीतील जनता बहरीनला विकांताला (Weekend) बहरीनला जीवाचे बहरीन करण्यास जाते. त्यांच्या साठीही तो देश सौदीतील जाचक नियमांमुळॆ  मृगजळच आहे.  सौदीच्या सुल्तानाने सौदी आणि बहरीन ला जोण्यासाठी समुद्रावर एक पुल बांधला आहे, जो विकांताला जास्तीत जास्त वापरला जातो 😉

     सौदी ते बहरीन हा 480 ते 500 किलोमीटरचा प्रवास आहे. भर वाळवंटातुन हा प्रवास करावा लागतो. आजुबाजुला प्रेक्षणीय काहीही नसल्यामुळॆ हा प्रवास फारच रुक्ष होतो, पण बहरीन गाठायच्या कल्पनेनेच तो सुसह्य होतो.

     सौदीतुन बहरीनला जाण्याचा समुद्रावरील रस्ता फारच छान आहे. सौदीमधे एकंदरीतच इंफ्रास्ट्रक्चर फार छान आणि अद्यावत आहे. सर्व रस्ते अमेरिकेच्या धर्तीवर आणि आंतरराष्ट्रीय नॉर्म्सचे काटेकोर पालन करणारे आहेत.

     480 किमी अंतर कापल्यावर, हा सुंदर रस्ता आणि पूल पार केल्यावर दिसतो बहरीनचा स्वागत फलक. इथे 'या आपले स्वागत आहे' 'बहरीन वेल कम्स यु' असला काही प्रकार दिसला नाही. पण त्याचे काही वाटून घेतले नाही, सौदीमधुन घटकाभर सुटका करून देणार्‍या देशात स्वागत फलकापेक्षा जे हवे होते ते मिळणार होते आणि स्वागत फलकापेक्षा त्याचे महत्व कैक पटीने जास्त होते 🙂

                सुंदर बहरीन शहर--

     बहरीनमधल्या सुंदर इमारती. अत्याधुनिक आणि अद्यावत आर्किटेक्चर वापरून बांधलेल्या इमारती मला फारच आवडल्या. ह्या बहरीनच्या राजेशाही कुटुंबाच्या कलात्मकतेची जाणीव करून देण्यार्‍या आहेत.

     बहरीनचे राजे आणि राजकुमार, ह्यांच्या संमतीशिवाय इथे झाडाचे पानही हलु शकत नाही. सौदीच्या राजाशी ह्यांचा राजेशाही घरोबा आहे. बहरीन मधे जेव्हा स्वातंत्र्यासाठी जनतेचा उठाव होत होता तेव्हा सौदीने ह्या राजे आणि राजकुमारांच्या आणि बहरीनच्या संरक्षणासाठी सौदीचे लष्कर बहरीनला रवाना केले होते. (पण बहरीन एवढे मुक्त आहे की तिथल्या जनतेला अजुन काय हवे आहे ते काही मला कळले नाही, असो ते म्हणतात ना जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे, तसे काहीसे असावे)

     आणि आता शेवटी सर्वात महत्वाचे, जे काम करण्यासाठी येवढी यातायात केली ते काम 'मदिरापान'. मी आणि माझा कलीग संपथ मनसोक्त आणि 'हलेडुले' होइपर्यंत एका महिन्याचा कोटा पुर्ण करून घेण्यात दंग. पुढचा एक महिन्या ह्या 'हाय' वर आणि आठवणींवर काढायाचा होता 😦

     असे हे मला भावलेले बहरीन, वाळवंटातले मृगजळ.

--ब्रिजेश मराठे
--------------
(जुलै 22, 2011)
-----------------

                    (साभार आणि सौजन्य-ब्रिजेश मराठे.वर्डप्रेस.कॉम)
                                 (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.08.2022-सोमवार.