मराठी चित्रपट-पावनखिंड-युगत मांडली

Started by Atul Kaviraje, August 22, 2022, 08:51:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक वीरश्रीपूर्ण मराठी चित्रपट "पावनखिंड", या चित्रपटातील छत्रपती शिवरायांचे एक युक्ती-गीत. या गीताचे बोल आहेत- "युगत मांडली"

     बहिर्जी नाईक सांगतायत राजांच्या युक्तीची गोष्ट 'युगत मांडली' या कूट भारूडातून.
'युगत मांडली' पावनखिंड चित्रपटाचं पहिलंवहिलं, आपल्या सर्वांचं गाणं. पाहा शेअर करा.

                                     "युगत मांडली"
                                    --------------

हे.. हे हे हे, हे हे हे
हे हे हे, हे हे, हे हे, हे हे!
हे हां
हे ना हां, ह्यं
हां हा ह्यं

आरं दुश्मन असू दे गनिम असू दे
किती बी हुशारं
अरे असू दे की
आरं दुश्मन असू दे गनिम असू दे
किती बी हुशारं

शिवरायांच्या बुद्धी युक्तीचा
लाग ना पारं
शिवरायांच्या बुद्धी युक्तीचा
लाग ना पारं
ऐ लाग ना पारं, लाग ना पारं
आरं लाग ना पारं, लाग ना पारं
हे शिवरायांच्या बुद्धी युक्तीचा
लाग ना पारं हां

हो हो री, हो हो री, हों
अहो काय सांगता नाईक
आरं मंग काय गड्या हो (ह्यं)

त्यो बसला हाय ना गनिम – खाली
वेढा मांडूनिया लई वेळ – झाली
अनं मुघलांनी नजर वाकडी – केली
मग राजानं काय केलं
काय केल महाराज

राजांनी आता युगत – मांडली
(काय मांडली)
आरं युगत मांडली (ह्यं)

युगत मांडली युगत मांडली
(युगत मांडली युगत मांडली)
आरं युगत मांडली, राजानं युगत मांडली
(युगत मांडली युगत मांडली)

बघा बघा बघा युगत मांडली
राजांनी आता युगत मांडली
शिवरायांनी युगत मांडली
महाराजांनी युगत मांडली
अशी ही युगत राजांनी मांडली
पंताशी जुबान  राजांनी धाडली
सिद्धीच्या खेम्यात गडबड झाली
पंत तो जिभेन गोंधळ घाली

(शिवबा स्वतः भेटाया येणार
सुलूख होणार हो
शिवबा स्वतः भेटाया येणार
सुलूख होणार हो)

हे शिवबा स्वतः भेटाया येणार
सुलूख होणार हो

हो हो री, हो हो री, हों
(आरं देवा, नाईक सुलूख होणार)
आता राजांच्या मनीच कुणाला ठावं
(आवं तुमासनी ठावं नाही आसं झालंय व्हय नाईक)
आरं खरंच नाही
मला फकस्त एवढंच ठाव की (ह्यं)

बघा बघा बघा युगत मांडली
राजांनी आता युगत मांडली
शिवरायांनी युगत मांडली
आता महाराजांनी युगत मांडली
राजानं काहीतरी युगत मांडली

सिद्धीची आता युक्तिच गंडली
वाटू दे त्याला बांदिलकी ची भीती
राजान त्याला वसाड घातली

कसा हरवलां कसा आपटलां
कळं न त्याला हो
कसा हरवलां कसा आपटलां
कळं न त्याला हो ---2 वेळा
(आरं कळं न त्याला हो!)

===================
संगीतकार  – देवदत्त  मनीषा  बाजी
गायक  – अवधूत  गांधी, हरिदास शिंदे
गीतकार – दिगपाल  लांजेकर
म्युझिक ऑन - एवरेस्ट  मराठी
===================

       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लेटेस्ट मराठी हिंदी लैरिकस.ब्लॉगस्पॉट.कॉम)
      -----------------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.08.2022-सोमवार