पाऊस वेडी

Started by shanu, July 15, 2010, 11:12:08 PM

Previous topic - Next topic

shanu

पाऊस पडताना का महिती नाही मनाचं भिरंभिरं होते
फुलपाखरा प्रमाणे पंख लेऊन तुझ्या आजुबाजुस घुटमळते

हा पऊस येतो तो वेगळीच हुर हुर घेऊन येतो
मला तुझ्यात अधिक अधिक गुंतवून ठेवतो

असे वाटते पाखरू व्हावे मी, मला सोनेरी पंख फुटावे
क्षणाचा ही विलंब न लावता तुझ्या मिठीत विरघळून जावे

मला खरतरं पाऊस खूप खूप आवडतो
अन अशा पावसात तुझा विरह नकोसा होतो

कशी समजावू मी माझ्या वेड्या मनाला....
कशी सावरु सांग अशा चिंब ओल्या क्षणाला....


--------- श्वेता

pankh09

कसा समजावू मी माझ्या वेड्या मनाला
कस सावरु सांग अशा चिंब ओल्या क्षणाला....................


या ओळी खुप चांगल्या आहेत........एक suggestion आहे....राग मानू नकोस ....या दोन ओळींची सुरवात जर  " कशी " ने केलीस तर आणखी चांगल्या वाटतील त्या........

कशी समजावू मी माझ्या वेड्या मनाला....
कशी सावरु सांग अशा चिंब ओल्या क्षणाला....


आणि कवितेच नाव  " पाऊस वेडी " का नाही ? 

shanu

धन्यवाद मित्र,
मी प्रथमच फोरमवर माझ्या कविता टाकल्या आहेत. माझ्या कवितेत काही सुधारणा असतील तर त्या सांगत जा. पुन:श्च्य धन्यवाद!!!

--------- श्वेता

Swan

कशी समजावू मी माझ्या वेड्या मनाला....
कशी सावरु सांग अशा चिंब ओल्या क्षणाला....
मस्त  आहेत या ओळी ..

सध्या पाऊस  नसला तरी भिजल्यासारखे वाटतंय   !!!! 8)