प्रश्नांचा सांगोता

Started by Shrikant R. Deshmane, August 24, 2022, 01:20:35 AM

Previous topic - Next topic

Shrikant R. Deshmane

आल्या पासून पाहत होतो,
ती नजरेत काहीतरी शोधत होती,
मी नजर चुकवली खरी,
पण ती मात्र स्तब्ध होती,
मी चोरटा कटाक्ष टाकला, अन वाटलं,
तिला काहीतरी विचारायचय,
मी आधीच निरुत्तर, म्हणालो,
मला थोडं लवकरच निघायचंय,
न राहवून तिने विचारलंच,
मी तुला खरच आवडते ना?
प्रश्न साधाच, पण मनाची धडधड थांबेना,
काय बोलू अन कसं बोलू, खरंच काही सुचेना,
तिला उमगलं, माझ्या अनुत्तरित प्रश्नावर तिने ठेवलं बोट,
क्षणाचाही विलंब न करता, जवळ ओढून तिच्या ओठांवर ठेवलं ओठ..
ती बेचैन झाली, पण तिचा सोडवायचा प्रयत्न असफल गेला,
मी मात्र मिठीत घेत, उरल्या प्रश्नांचा सांगोता केला...

श्रीकांत रा. देशमाने
दि: २४/०८/२०२२
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]