*थोड माझ्या मनातले*

Started by nikhil@39, August 24, 2022, 02:58:57 PM

Previous topic - Next topic

nikhil@39

*थोड माझ्या मनातले*

काल स्टेशन ला मी ट्रेन साठी उभी होती आणि तुझ्या सारखा मुलगा माझ्या समोरून गेला आणि तुझी आठवण आली मला
जेंव्हा एखादया वेडीची आपल्या सजनाची वाट बघताना ची व्याकूळ नजर बघते त्याच नजरेने तुला मी काल आठवले
कधी स्वतःलाच आरश्यात बघते, आयुष्याच्या जबाबदाऱ्या पार पाडणारा मुखवटा बाजूला करून पहीलेची तुझी वेडी मी मला दिसते,
तुला माहीत नसेल रे मी पण तुझ्या प्रेमात होते
आयुष्यात मागे वळून बघते, तेंव्हा अनुभवते,
असे क्वचितच क्षण असतील जेंव्हा तुझी आठवण नसेल,
पण काही क्षण असे आहेत की जेंव्हा काय सांगू मेंटल तुझी खूप आठवण येते
मी रोज तुझ्याच साठी खिडकी शेजारी बसायची तुला पाहून मी पण खुश व्हायची
वर्गात तुझी एन्ट्री जरा भारीच होती वर्गात तुला येताना पाहून शिक्षक कमी पण मी खुश व्हायची
मी तर तुझी वर्गातील मारामारी भांडण खूप एन्जॉय केली
तुझा स्वभा माला तर समजला नाहीच मला काय कोणालाच अजून समजला नसेल
तू कधी काय करशील याचा मात्र नेम नव्हता
तू इतका रागीट होतास ना आम्हाला काय शिक्षकांना पण तुझी भीती वाटे
तुला आठवते का रे तो पाऊस ज्या पावसात बस नाही आली आणि तुला सर्वांनी मला घरी सोडायची विनंती केली,मला खरच तुझ्या सोबत bike वरू भिजत घरी जायचं होतं
पण तू चिडला आणि नाही बोललास
तेव्हा मला खूप तुझा राग आला होता, तू जेव्हा गाडी बाहेर लावायचा तेव्हा मी तुझा गाडीवर रोज बसायचे
तू रोज सुसाट वेगाने गाडी पळवत clg ला याचा ,पण मी जेव्हा बसले तेव्हा तू का नाही पळवली तशी,तू मात्र सावकाश सावकाश चालत हातास मला तुझ्या खांद्यावर हात ठेवायचं होत पण तुझं ते दप्तर मधी येत होतं
तुझ्या सोबत खूप भांडलो ना मी sorry हा
तुझ्यावर खरच माझं प्रेम होतं रे पण तुला सांगायची हिंमत झाली नाही
तुला प्रेम म्हणजे काय तेच माहीत नाही
त्या दिवसी तू स्टेज वर येशील मला पाणी देशील अस वाटलं होत पण तू पाय लांब करून खुर्ची झोपला हातास
का तुला कळू नये माझ्या ह्रदयाची व्यथा
तू असा जायला निघालास, थांबवू तरी कसे आता
कधी-कधी वाटते, रडण्याचा आवाज तरी यायला हवा होता
निदान, ते एकूण तरी तू वळला असतासं
पण खरंच सांगते, त्या क्षणी मीच माझ्याशी हरले होते..
आयुष्य जणू आता, येथेच पूर्णपणे सरले होते
खरंच, तू थांबायला हवे होते
उरलेल्या आयुष्यात
तुझ्या कुशीत डोकं ठेऊन
एकदा तरी आयुष्यभराचं मन
मोकळं कर।