पुन्हा वर्गात जावं

Started by nikhil@39, August 24, 2022, 03:07:36 PM

Previous topic - Next topic

nikhil@39

वाटे पुन्हा त्या वर्गात जावं
एकमेकांसाठी पुन्हा अनोळखी व्हावं
क्षण अपुरे ते सुटलेले,पुन्हा त्यांना  नव्याने जगाव
तो वर्ग आणि ती शेवटची बाक सर्वकाही पुन्हा अनुभवावं
वर्गातील ती भांडण  मनभरून पाहावं
आणि पेपर ला मात्र त्यालाच उत्तर दाखव बोलावं
आमची मैत्री जर वेगळीच होती
वर्गात मोजून १८ जण आम्ही
पण राग कधीच कोणाचा मनात नाही
आज ही कुठे भेटलो आम्ही तर जुने किस्से सांगून पुन्हा ते दिवस डोळ्यासमोर उभे राही
किस्से सांगताना तिची सर्व अजून ही आठवण काठी
तीला हळूच डोकावून वळून पाहन
तिने माघे वळून पाहता माझं ते हसन
तिला सोडून अख्या वर्गाला माहीत होणं
कधी कधी शेवट बाकावरून वहिनी हाक मारणारे ते हरामी मित्र
वाटे पुन्हा त्या वर्गात जावं
एकमेकांसाठी पुन्हा अनोळखी व्हावं


     स्वलिखित
                    निखिल अनंत भडेकर