एक तर्फी

Started by nikhil@39, August 24, 2022, 03:10:45 PM

Previous topic - Next topic

nikhil@39

मी तिला रोज पाहायचो पापण्यांच्या आड तिला दडवायचो
रोज सकाळी  बस स्टॉप वर तिची वाट पाहायचो
तिची बस येता ती हळूच खिडकीतून मान काढायची
तिला पाहून मी मात्र खुश होयचो
तिची बस पुढे जाता मी clg साठी निघायचो
बस ला cut मारून तिच्या आधी clg ला जायचो
Clg गेट ला उभा राहून तिला  बस मधून उतरताना पाहायचो
ती class मध्ये जाता मी पण class मध्ये आरामात जायचो
शेवट बाकावर बसून तिलाच पाहायचो
ती समोर असता नजर हटत नाही,तिची नजर वळता बेभान मन आवरतो
तिच्या चेहऱ्यावर उमटलेले स्मित,हळुच मनाच्या तिजोरीत साठवतो
तिच्या मुळे माझी मात्र हजेरी 100% लागत होती
Clg life तर आपली भारी होती
अशी माझी एक तर्फी प्रेम कहाणी होती

                     निखिल भडेकर