तुझ्या आठवणी

Started by kaustubh kandekar, August 25, 2022, 07:30:33 PM

Previous topic - Next topic

kaustubh kandekar


तुझ्या आठवणी म्हणजे..
    मोरपिसाचा हळुवार स्पर्श
तुझ्या आठवणी म्हणजे..
    नकळत निर्माण होणारा हर्ष
तुझ्या आठवणी म्हणजे..
    स्वप्नांनी सजवलेलं एक गाव
तुझ्या आठवणी म्हणजे..
     विरह सागरात हरवलेली नाव
तुझ्या आठवणी म्हणजे..
     फुलाची उमलणारी नाजूक कळी
तुझ्या आठवणी म्हणजे..
     ओठांवर हास्य येऊन
     गालावर नकळत पडणारी खळी..