अर्थ तुला कळूदे

Started by Prasad Chindarkar, July 17, 2010, 11:14:24 AM

Previous topic - Next topic

Prasad Chindarkar

अर्थ तुला कळूदे

-------------------------------------
-------------------------------------

दिवस उन्हाळ्याचा आहे तापलेला
पण जीवाची घालमेल उन्हामुळे नाही
आयुष्याचा वाटेवर जे वळण मी घेतलेलं
आपल्या सुखाचा गावी आपल्याला पोचवेल कि नाही

जुळलेली मनं कधी वेगळी होऊन धड-धडताना
कधी एकमेकां पासून लपवून ठोके चुकवताना
डोळ्यात नसलेलं हसू ओठांवर उमटताना
वाया जातंय जीवन विरहात जगताना

तुझा वाटेला डोळे लाऊन बसताना
प्रत्येक क्षणात विचारांच्या वादळाचा पाऊस
डोकं म्हणतं नको वेडा होऊस
पण मनातनं हाक येते... नको ना जाऊस

वादळापासून लपायला तुझा कुशीत आलो तर
तिथे पण केलंय एका वादळाने घर
हि वादळे शांत होणार कधी
वाहणार कधी शांतपणे निथळ प्रेमाची नदी

आज माझे शब्दही वाऱ्यावर भिरभिरतायत
वावटळीचा आवेगात आपला अर्थ हरवतायत
अर्थ पूर्ण हरवायचा आत वावटळ सरूदे
शब्दांचा ह्या माझ्या अर्थ तुला कळूदे... अर्थ तुला कळूदे...

                      ...........Author Unknown

LAVESH

तुझा वाटेला डोळे लाऊन बसताना
प्रत्येक क्षणात विचारांच्या वादळाचा पाऊस
डोकं म्हणतं नको वेडा होऊस
पण मनातनं हाक येते... नको ना जाऊस