जीवनमूल्य-मुलींनो,जरा जपून

Started by Atul Kaviraje, August 27, 2022, 08:06:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "जीवनमूल्य"
                                     ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री विक्रम, यांच्या "जीवनमूल्य" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "मुलींनो,जरा जपून"

               मुलींनो,जरा जपून--

     कालच्या जेसिका ते रुचिका या पोस्टवरून आणि त्यावरील अपर्णाच्या अभिप्रायावरून असा प्रश्न पडला कि आजच्या जमान्यात आपण जी महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत आहोत त्यात कमीत कमी स्त्री तरी सुरक्षित आहे का ? जी कोणाची तरी आई बहिण,मुलगी, बायको, प्रेयसी असते.

     एका सामान्य विद्यार्थिनीला अजाणत्या वयात विनयभंगासारख्या किळसवाण्या घटनेला सामोरे जावे लागले कि काय होते हे रुचिकाच्या घटनेमुळे पहायला मिळाले. या घटनेने सामाजिक जाण राखून असणार्या सभ्य आणि सुशिक्षित समाजाला हादरवून टाकले.वयाने,हुद्द्याने कितीही मोठ्या असलेल्या व्यक्तीचे पाय घसरू शकतात आणि त्यातून एखाद्या निष्पाप जीवाचा घात होऊ शकतो हे त्यामुळे लक्षात आले.रुचीकाला आणि तिच्या परिवाराला अत्यंत दुर्दैवी परिस्थितीतून जावे लागले.अशी परिस्थिती यापुढे कोणावरही येऊ नये यासाठी ठोस पावले उचलणे आता अत्यंत आवश्यक ठरणार आहे.
रुचीकाच्या वाट्याला जे काही आले ते कोणत्याही मुलीच्या वाट्याला कधीही आणि कोठेही येऊ शकते.हि वस्तुस्थिती आहे आणि ती अशा मुलींच्या पालकांना अस्वस्थ करणारी आहे.यावर उपाय काय????

     यापासून मुला मुलीना सतत सावध करणे आणि असा प्रसंग आपल्यावर आलाच तर त्याचा प्रतिकार कसा करावा याचे प्रशिक्षण देणे हाच यावर उपाय असू शकतो.
मुलामुलींना लैंगिक शिक्षण द्यावे वैगेरे बोलले जाते पण ती जबाबदारी शाळांची आहे आणि हे शिक्षण शिक्षकांनीच दिले पाहिजे असे म्हणून हि जबाबदारी त्यांच्यावर ढकलली जाते. तरीही लैंगिक शिक्षण देऊन हि समस्या सुटेल का?

     मुला मुलींवर असा प्रसंग आलाच तर त्याचा मुकाबला कसा करावा,याबाबत कोणाकडे कशी तक्रार करावी याची माहिती त्यांना असली पाहिजे.याबाबत त्यांच्या पाठीशी कोणीतरी उभे राहिले पाहिजे.मुलांचा लैंगिक छळ मोठ्या प्रमाणात होतात हे सरकार जाणते परंतु तरीही त्यावर ते ठोस उपाय शोधात नाही या गोष्टीची चीड येते.

     अशा पिडीत मुलामुलींनी आपली तक्रार आई-वडिलांच्या कानी घालावी असे कितीही बोलले जात असले तरीही अजून तरी आपल्या कुटुंबव्यवस्थेत तेवढा मोकळापणा आलेला नाही.त्यामुळे अशा गोष्टींवर काय उपाय असावा ????

--लेखक: विक्रम एक शांत वादळ
(बुधवार, ३० डिसेंबर, २००९)
------------------------------

                   (साभार आणि सौजन्य-जीवनमूल्य ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  ---------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.08.2022-शनिवार.