जयंत कुलकर्णी-फ्रेंच राज्यक्रांती-(लेख क्रमांक-2)

Started by Atul Kaviraje, August 28, 2022, 08:37:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "जयंत कुलकर्णी"
                                     ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री जयंत कुलकर्णी, यांच्या "माझे मराठीतील लेखन" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "फ्रेंच राज्यक्रांती"

                      फ्रेंच राज्यक्रांती--(लेख क्रमांक-2)
                     -------------------------------

     माझा चष्मा काही ठीक नाही. मला वाटते तू माझ्यासाठी मी सहा महिन्यापूर्वी आणला होता तसा नवीन चष्मा आणावास हे बरं. चांदीचा नको. स्टीलचाच आण कारण तो नाकावर नीट बसतो. १५ नंबरचा चष्मा माग. त्या दुकानदाराला ते बरोबर समजेल. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, लोला, मी तुझ्याकडे तुझ्या निरंतर प्रेमाची मागणी करतोय. तुझे एक चित्र मला पाठव. ज्या माणसाला त्याच्या देशबांधवांच्या प्रती एवढी सहानुभूती वाटायची त्या माणसाबद्दल तुझ्या चित्रकाराला निश्चितच सहानुभूती वाटेल व तो तुला दिवसातून दोनदा चित्र रंगवण्यासाठी बोलावेल आणि ते चित्र पूर्ण करेल. या भयंकर जागेत ज्या दिवशी मला तुझे चित्र मला मिळेल तो दिवस माझ्यासाठी सगळ्यात मोठा सण असेल. आनंदाचा आणि आनंदात धुंद होण्याचा दिवस. ते चित्र मिळेपर्यंत मला तुझ्या केसांची एक बट पाठव जी मी माझ्या हृदयाशी जपून ठेवीन.

     माझ्या प्रिय ल्युसिला! आपल्या प्रेमाच्या सुरुवातीच्या दिवसांची मला आठवण येतेय!. मला आठवतंय जेव्हा एखादा माणू केवळ तुझ्याकडून आलाय यासाठी मला फार महत्त्वाचा वाटे. कालच ज्या माणसाने माझे पत्र तुला पोहोचते केले तो परत आल्यावर मी त्याला विचारले, ''तू तिला पाहिलेस का?'' त्याने होकारार्थी उत्तर दिल्यावर क्षणभर मला तू तेथेच उभी आहेस असा भास झाला. तो बिचारा सरळ साधा माणूस आहे, कारण तो माझी पत्रे तपासत नाही. माझ्या कानावर आलंय की हा माणूस मला दिवसातून दोनदा भेटणार आहे. एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी. आपल्या प्रेमाच्या दिवसात आपले निरोप पोहोचते करणारे जेवढे मला प्रिय होते तेवढाच हा माणूसही मला प्रिय आहे, कारण तो आपल्या अडचणींच्या काळात आपले निरोप पोहोचते करतोय.

     आज मला खोलीच्या एका भिंतीत एक भेग पडलेली आढळली. मी त्याला कान लावल्यावर कोणाचातरी विव्हळण्याचा आवाज मला ऐकू आला. मी त्याला बोलते केले. त्याने माझे नाव विचारल्यावर मी त्याला माझे नाव सांगितले. ते ऐकल्यावर तो किंचाळलाच, ''अरे देवा'' एवढे बोलून त्याने पलंगावर अंग टाकल्याचा आवाज मला आला. त्याच क्षणी मी त्याचा आवाज ओळखला. तो फॅब्रे द इग्लाटिना होता.

     ''हो मी फॅब्रे द इग्लाटिनाच आहे.'' तो मला म्हणाला.

     ''पण तू? आणि इथे? कसं शक्य आहे? म्हणजे प्रतिक्रांती झाली की काय?

--जयंत कुलकर्णी.
(August 19, 2022)
---------------------

                       (साभार आणि सौजन्य-जयंत पुणे.वर्डप्रेस.कॉम)
                                  (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                      ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.08.2022-रविवार.