लवकर ये बाप्पा.....

Started by Rushi.VilasRao, August 29, 2022, 08:02:10 AM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

संपला आता श्रावण मास....
मनाला तुझ्या येण्याची आस...
होतोय चालू भाद्रपद काळ...
माझ्या घरी येणार गौरी-शंकराचा बाळ...
वर्षातून एकदाच येतोस खर...
पण तू आल्या वर मनाला वाटत बर...
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
आता घुमेल दाही दिशांना ढोल ताशांचा गजर...
मना मनात उसळणार तुझ्या भक्ती भावाचा सागर...
तुला बसायला सजवून ठेवलाय चांदीचा मखर...
सार घर मंत्रमुग्ध करून टाकत एवढं तुझं तेज प्रखर...
सजवून ठेवलेत दुर्वांचे अन् सुगंधी फुलांचे हार...
आता ये लवकर बाप्पा वाट पाहायला लावू नकोस फार...
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan