चारोळी पावसाची-क्रमांक-41-अवखळ पाऊस आणि खट्याळ प्रियकर

Started by Atul Kaviraje, August 29, 2022, 11:05:52 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     चारोळी पावसाची
                                        क्रमांक-41
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --चारोळीकार नवं-कवयित्रीला  पाऊस  आवडतो . तिचे  तिच्या  प्रियकरावरही  तेवढेच  प्रेम  आहे . तोही  तिला  अतिशय  आवडतो . अशीच  केव्हातरी पावसात  अवचित  ओळख  झाल्यानंतर  त्यांचे  प्रेम  फुलतं  गेले  होते . आता  तर  त्या  प्रेमाला  काहीही  निर्बंध  नाहीत , बंधने  नाहीत , सीमाही  नाही  उरलीय . इतके  ती  दोघे  एकमेकांत  मनाने  एकरूप  झाली  आहेत . आणि  हे  सारं  सारं  घडविणारा  तो  पाऊस , तिची  आणि  त्याची  पावसातील  ती  पहिली  भेट  तिला  अजूनही आठवतेय . आणि  तेव्हापासून  तिला  पाऊस  अतिशय  आवडू  लागला  आहे , कारण  या  पावसानेच  तिला  तिचे  प्रेम  दिले  आहे , जीवनात  आनंद  भरला  आहे . तिला  जीवनाचा  अर्थ  दिला  आहे , जीवन  जगण्याचं  एक  कारण  दिले  आहे .

     हे  सर्व  सांगताना  ही  नवं-कवयित्री  अतिशय  भावुक  झाली  आहे . या  पावसातंच  त्यांचं  प्रेम  फुलतं  गेलंय , प्रेमाचे  बीज  रुजून  त्याचे  रूपांतर  आता  एक  प्रेम-वृक्षात  झाले  आहे . थोड्याच  अवधीत  त्यांनी  लग्नही  करायचे  ठरविले  आहे . त्या  दोघांना  एका  सूत्रात  बांधणारा  हा  पाऊस , त्याचे  ती  दोघेही  अत्यंत  ऋणी  आहेत . त्यांच्या  मंगल  जीवनाची  सुरुवात  आता  थोड्याच  काळात  होईल. पण  तोपर्यंत  तरी  आपण  असंच   पावसात  भेटत  राहू , चिंब  भिजत  राहू , मौज  करीत  राहू , असा  या  दोघांचाही  मानस  आहे . अर्थात  लग्न  झाल्यावर  थोडी  बंधने  ही  येणारच . तेव्हा  तोवर  तरी  आपण  प्रेमी-प्रेमिकाचे  जीवन  अगदी  मनसोक्त  जागून  घ्यावे , असं  ती  दोघेही  म्हणतात .

     त्यादिवशी असंच  घडलं . आपल्या  प्रियकराची  नेहमीप्रमाणे  वाट  पाहता , प्रतीक्षा  करता , तो  नेहमीप्रमाणे  वेळेवर  तर  आलाच  नाही . त्याचे  हे  नेहमीचेच  होते . हे  तिलाही  आतासे  ठाऊक  झाले  होते . पण  हे  प्रेम , थोडंच  थांबणार  आहे . अशीच  त्याच्या  प्रतीक्षेत  असता , अचानक  आभाळ  भरून  आलं  आणि  पाहता  पाहता  पावसाचा  गार  शिडकावा  सुरु  देखील  झाला . ती  चिंब  भिजता , तिला अवचित  जाणवले  की  आपले  डोळे  कुणीतरी  पाठून  येऊन  झाकले  आहेत , आणि  आपल्या  गालांवर  कुणाचेतरी  अधर  स्पर्श  करून  जात  आहेत . ती  समजली , की  हा  खट्याळपणा करणारा  दुसरा  तिसरा  कुणी  नसून , तोच  आहे .

     आणि  मग  ती  शहारली , मोहरली , तिच्या  अंगांगांवर  रोमांच  फुलले , तिची  कायI त्याच्या  स्पर्शाने , आणि  पडणाऱ्या  पाण्याच्या  सुखद  गार  थेम्ब-स्पर्शाने , जाणिवेने  बिथरली , बहरली  आणि  हलकेच  ती  त्याला  बिलगली . तिला  हवा-हवासा  वाटणारा  तो  हाच  क्षण  होता . कृतक-कोपाने  मग  ती  दोघांनाही  दूषणे  देऊ  लागली , की  काय  हे , तुम्ही  दोघेही  (म्हणजे  हा  पाऊस  आणि  तिचा  प्रियकर ) असंच  न  कळवता  येता आणि  मी  नको  नको  म्हणतं  असता , मला  चिंब  भिजवून  जाता . तिची  जरी  यात  नकार-घंटा  असली , तरी  मनापासून तिला  हे  सर्व  हवंय , हे  चारोळीतून  स्पष्टपणे  जाणवत  आहे . (येथे  पडणारा  पाऊस  तिला  चिंब  भिजवीत  आहे , आणि  तिचा  प्रियकर  तिला  आपल्या  प्रेमात  चिंब  भिजवत  आहे .)

अवखळ पाऊस आणि खट्याळ प्रियकर
----------------------------------
तू आणि पाऊस,
असेच अवेळी येता,
नको नको म्हणता,
चिंब चिंब करून जाता.
===========

--नवं -चारोळीकार
-----------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी पिक्चर्स.कॉम)
                  --------------------------------------------

------संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.08.2022-सोमवार.