IIश्री गणेशाय नमःII-श्री गणेश चतुर्थी-सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला

Started by Atul Kaviraje, August 31, 2022, 11:28:20 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    IIश्री गणेशाय नमःII
                                     "श्री गणेश चतुर्थी"
                                   -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज  दिनांक-३१.०८.२०२२-बुधवार, श्री गणेश चतुर्थी चा पावन दिन आहे . श्री गणेश चरणी वंदन करून, ऐकुया श्री गणेश चतुर्थी  गीत - "सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला"

     श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा "शिवा" असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे.

     गणेश चतुर्थीचा पवित्र सण जवळ आला आहे, श्रीगणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. चला तर मग जाणून घेऊया, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी आणि पूजा साहित्य यादी

     हिंदू कॅलेंडरनुसार, गणेश चतुर्थीचा पवित्र सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो  आणि तेव्हापासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. गणेशोत्सवाचा हा उत्सव 10 दिवस चालतो. प्रत्येक घरात गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते, 10 दिवस मनोभावे पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाची विधिवत पूजा करून आणि मूर्तीचे विसर्जन केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, श्रीगणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

             गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त--

चतुर्थी तिथी प्रारंभ: 30 ऑगस्ट 2022 दुपारी 03:33 वाजता
चतुर्थी तिथी संपन्न : 31 ऑगस्ट 2022 दुपारी 03:22 वाजता
गणेश चतुर्थी उपवास तारीख: 31 ऑगस्ट 2022
गणेश चतुर्थी 2022 पूजा- पद्धत--

     गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करून घरातील मंदिरात दिवा लावावा. गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. भाविकांनी आपल्या इच्छेनुसार गणपतीची मूर्ती स्थापन करावी. यानंतर मूर्तीला गंगाजलाने अभिषेक करावा. आता गणपतीला फुले आणि दुर्वा अर्पण करावे. दुर्वा गणपतीला अतिशय प्रिय आहे. असे मानले जाते की, दुर्वा अर्पण केल्याने गणेश प्रसन्न होतो आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतात. श्रीगणेशाच्या पूजेच्या वेळी मूर्तीला शेंदूर लावा आणि आवडते भोग मोदक किंवा लाडू अर्पण करा. पूजेच्या शेवटी, आरती करून श्रीगणेशाची पूजा करा आणि प्रार्थना करा. शेवटी प्रसादाचे वाटप करावे.

             गणेश चतुर्थी पूजा सामग्री लिस्ट--

भगवान गणेश की प्रतिमा
लाल कपड़ा, जानवं
दूर्वा, कलश
नारळ, शेंदूर
पंचामृत, मौली लाल
पंचमेवा, गंगाजल, मोदक, लाडू
दुर्वा, हार, अक्षदा
कपूर, धूप, अगरबत्ती, दिव्यासाठी तूप, वात

--श्रेया वार्के
-----------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठी.लेटेस्टली.कॉम)
                 ---------------------------------------------

                            "सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला"
                           ------------------------------

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला
ढगांचा ढोल घुमु लागला
बिजलीचा ताशा जसा कडकड कडाडला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला
ढगांचा ढोल घुमु लागला
बिजलीचा ताशा जसा कडकड कडाडला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
आला आला आला माझा गणराज आला

कोरस - आला आला आला माझा गणराज आला

मंगलमय अन तेजकुंज गजाननाचे रूप

कोरस - मंगलमय अन तेजकुंज गजाननाचे रूप
करुणा सागर चैतन्याचे हे ओंकार स्वरूप
कोरस-करुणा सागरचैतन्याचे हे ओंकार स्वरूप
दर्शनाने जाते सारे त्याच्या सर्वदैन्यदुख

कोरस-दर्शनाने त्याच्या जाते
कोरस-सर्व सर्वदैन्यदुख
चिंता मुक्त होऊनिया मिळे हर सुख
कोरस -चिंता मुक्त होऊनिया मिळे हर सुख
त्याच्या दर्शनाने माझा जीव वेडा झाला
आला आला आला माझा गणराज आला
कोरस - आला आला आला माझा गणराज आला

भक्तीमधे न्हाऊन भक्त झाले ओले चिंब
कोरस-भक्तीमधे न्हाऊन भक्त झाले ओले चिंब
गणेशाच्या भजनात नाचण्यात दंग
कोरस - गणेशाच्या भजनात नाचण्यात दंग
सान थोर दंग सारे उडवीती रंग
कोरस - सान थोर दंग सारे उडवीती रंग
आनंदाच्या डोहिफुले आनंद तरंग
कोरस - आनंदाच्या डोहिफुले आनंद तरंग
वाऱ्याचा सुगंध मंद सांगे ज्याला त्याला
आला आला आला माझा गणराज आला
कोरस - आला आला आला माझा गणराज आला
सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला

ढगांचा ढोल घुमु लागलाsss
बिजली चा ताशा जसा कडकड कडाडला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला
ढगांचा ढोल घुमु लागलाsssss
बिजली चा ताशा जसा कडकड कडाडला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
आला आला आला माझा गणराज आला
कोरस -आला आला आला माझा गणराज आला
कोरस -आला आला आला माझा गणराज आला
कोरस -आला आला आला माझा गणराज आला
कोरस -आला आला आला माझा गणराज आला
कोरस -आला आला आला माझा गणराज आला
कोरस -आला आला आला माझा गणराज आला
कोरस -आला आला आला माझा गणराज आला
कोरस -आला आला आला माझा गणराज आला
कोरस -आला आला आला माझा गणराज आला

--SINGER UNKNOWN
------------------------
--गीतकार-गणेश वसंत साळुंखे पाटील
---------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-३१.०८.२०२२-बुधवार.