चारोळी पावसाची-क्रमांक-42-अश्रू आणि बरसणारे ढग

Started by Atul Kaviraje, August 31, 2022, 11:45:11 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      चारोळी पावसाची
                                         क्रमांक-42
                                     ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --कवयित्री  आपल्या  मनातील  भावना  सहजपणे या  चारोळीतून  आपल्याला  सांगून  जात  आहे . तिचे  कवी-मन  हे  फारच  सवेन्दनशील  असावे . एखाद्या  दुःखद  प्रसंगी  तिच्या  डोळ्यांतून  आसवेही  पटकन  टपकत  असावीत . ती  अतिशय  हळवी , नाजूक  अश्या  मनाची  असावी . आणि  अशी  ही  तिची स्थिती  जेव्हा  जेव्हा  पावसाचे  ढग  जमू  लागतात , जेव्हा  जेव्हा  गार  वारा  वाहू  लागतो , आणि  जेव्हा  जेव्हा  पाऊस  पडू  लागतो , तेव्हा  तेव्हा  तिचे  हळवे , संवेदनशील  मन  मग  अशी  चारोळी  करू  लागते . पावसाचे  आणि  तिचे  एक  आंतरिक  घट्ट  नाते  असावे , तिचे  आणि  पावसाचे  नेहमीच  जमत  असावे , तिचे  आणि  पावसाचे  अभिन्न  असे  घनिष्ट  अपनत्व असावे, त्या दोघांत आपलेपणा असावा.

     या  चारोळीत  ती  म्हणतेय , की  हे  ढगांनो , तुम्ही  भरभरून  बरसI , मुक्त  होऊन  वर्षवI , ओसंडून  वर्षा  करा , मला  चिंब  करा , माझ्या  मनास  चिंब  करा , मला  पाणीरूपी  स्पर्शाने  न्हाऊ  घाला , माझ्या  आसवांत  तुम्ही  एकरूप  व्हा , माझ्या  आसवांना  तुम्ही  तुमच्या  पडणाऱ्या  पाण्याने  आसरा  द्या , त्यांना  कुरवाळा , त्यांना  समजवा , त्यांचा  सांभाळ  करा . माझे  हे  अश्रू  म्हणजे  तुमचेच  एक  रूप  आहे . जसे  तुम्ही  ओसंडून , भरभरून  वाहताय , वर्षताय  तद्वतच  माझी  ही  आसवेही  झरत  आहेत . तीही  तुमच्याप्रमाणेच  ओसंडून  बरसत  आहेत . ती  खळतच  नाहीत , इतका  आनंद  मला  तुम्हा  पाहून  झाला  आहे .

     हे  ढगांनो , मला  तुम्हाला  पाहून  अतिशय  आनंद  झाला  आहे . पावसाची  नांदी  घेऊन  तुम्ही  क्षितिजावर  जमा  झाला  आहात . आता  थोड्याच  वेळात  तुम्ही  बरसूही  लागाल . माझ्या  मनाच्या  गाभाऱ्यात , जे  एके  काळी  काळोखाने व्याप्त   होते , त्यात  काहीच  तेज  नव्हते , ते  उदास  होते , ते  निराश  होते. त्यात  तुम्ही  आज  तुमच्या  येण्याने  चांदणे  फुलवले  आहे , आता  ते  उभारी  घेऊ  लागले  आहे , त्याला  आता  जगण्याचा  खरा  अर्थ  उमगला  आहे. आणि  हे  शक्य  झालंय , केवळ  तुमच्या  असण्यानेच . पुढे  ही  कवयित्री  असं  म्हणतेय , की  हे  माझे  नवीन  उभारी  आलेलं  मन , आता  गाऊ  लागलंय , नाचू  लागलंय , कुणावर  तरी  प्रेम  करू  लागलंय , कुणाच्यातरी  प्रीतीत  आकंठ  न्हाऊ  लागलंय . हे  ढगांनो , तुम्ही  सोबत  आणलेल्या  या  गार  वाऱ्यासवे  माझं  मन  आता  पिंगाही  घालू  लागलंय . ते  वाऱ्यासवे  मुक्त  होऊन  दाही  दिशांना  विचरु  लागलंय , उडू  लागलंय , त्याला  पंख   फुटलेत , ते  स्वच्छंद , मुक्त , स्वैर  झालंय . आज  ते  केवळ  तुमच्या  असण्याने  मला  प्रीत  शिकवून  गेलंय , ते  प्रेमात  अडकलंय. प्रीतीचे  गीत , गाणं  ते  गाऊ  लागलंय . हे  ढगांनो , माझ्यावर  तुमचे  अनंत  उपकार  आहेत , की  तुम्ही  मला  जगण्याची  एक  नवी  दिशा  दाखवून  दिलीत , एक  नवा  मार्ग  दाखवून  दिलात .

       अश्रू आणि बरसणारे ढग
      ----------------------
आसवांपरी ढग बरसूनी यावे,
मनाच्या काळोखात जणू चांदणेच फुलावे,
भिरभिरणाऱ्या वा-यासवे गीत नवे प्रीतीचे गावे,
आसवांपरी ढग सारे ओसंडून यावे.....
======================

--कवयित्री:साक्षी कांबळे
----------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विश मराठी.कॉम)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.08.2022-बुधवार.