गॅजेट-कीडा-२००९ मागे वळून पाहताना-लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, August 31, 2022, 09:25:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "गॅजेट-कीडा"
                                       -------------

     gadg.et.y-kee.daa - a unique species of human, which believes in something new every day.

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "गॅजेट-कीडा", या ब्लॉग मधील  एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "२००९ मागे वळून पाहताना"

                     "२००९ मागे वळून पाहताना"-लेख क्रमांक-१--
                    --------------------------------------

     सन २००९ मध्ये घडलेल्या गॅजेटविषयक दहा महत्त्वाच्या घटना मी आणि informationweek.com ने (वेगवेगळ्या) निवडल्या होत्या. मी माझी यादी देत आहे.

१. अँड्रोईड चा उदय - २००९ मध्ये प्रथमच, मोबाईलजगतात हार्डवेअरपे़क्षा सॉफ्टवेअरमध्ये जास्त विकास झाला. गूगलने मुक्त वापर (open-source) प्रकारात उपलब्ध केलेली मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रोईडने, स्मार्टफोन्सच्या जगात चांगलाच जम बसवला. हा मायक्रोसॉफ्टच्या विंडोजमोबाईलला मिळालेला अजून एकफटका. आताच नवीन जाहिर केलेल्या अँड्रोईड आवृत्तीमध्ये प्रथमच अॅडोब फ्लॅश १०.१ आणि अजून बरीचआकर्षक सोयी दिल्या आहेत. अँड्रोईडचा वाढणारा चाहतावर्ग, हा मुक्त माहिती आदानप्रदानाच्या गूगलच्याविचाराचा समर्थकच असेल.

२. मोटोरोलाचे पुनरागमन - वर्ष २००८ पर्यंत motorola हा कच्चा लिंबू मानला जात होता. पण २००९ मध्ये Motorola ने अँड्रोईड मालिकेतील अप्रतिम हँड्सेट्स देऊन त्यांनी ही कमी पूर्ण केली. ह्या क्रांतीला सुरुवात झाली MotoCLIQ पासून आणि आता मोटोड्रॉईड सारखे नवीन युगाचे प्रॉड्क्ट देऊन मोटोरोलाने २०१० चे स्वागत केलेआहे. बघुया, २०१० मध्ये अजून काय काय लपले आहे ते!

३. iPhone 3GS - सुरुवातीला, message forwarding सारखे काही बेसिक फीचर्स नसल्यामुळे भारतात थोड्याशिव्या खाल्लेल्या iPhone ने एकदम सुधारीत 3GS आवृत्ती आणली. अॅपलने एक संशोधित (evolutionary upgrade) म्हणून आणलेला हा प्रकार आयफोनसाठी क्रांतिकारक सुधारणा (revolution) ठरला. आधीच्यामॉडेलमध्ये असलेल्या जवळजवळ सर्व प्रॉब्लेमसना दुरुस्त करून, आता iPhone पूर्ण झाला आणि अपेक्षेप्रमाणेच या मॉडेलला प्रतिसादही चांगलाच मिळाला.

४. मोबाईल अॅप्लिकेशन स्टोअर - दुकान आता मोबाईल सॉफ्टवेअरसाठी - २००९ हे वर्ष गाजले ते mobile application stores या कल्पनेचा उगम म्हणून. सुरुवात अॅपलने iPhone Apps Store ने केली, मग Winmobile Marketplace आणि Android Community ने सुद्धा ही सुविधा उपलब्ध केली. अॅपल स्टोअरने १०००० अॅप्लिकेशन्सचा जादूई आकडा पार केला तोही याच वर्षी. (त्यातील किती अॅप्लिकेशन लोकांना आवडली हा एक संशोधनाचा विषय आहे!) या वर्षी सर्वात जास्त आणि वेगाने वाढलेल्या Android Community ने तर१३,००० चा पल्ला पार केलाय. हेच भविष्याचे बाजार असतील बहुतेक.

५. अॅपलने नाकारलेले GoogleVOICE - पुन्हा यावर्षीच्या सर्वात प्रसिध्द मोबाईलने अजून एकदा या यादीत नावमिळवले, पण या वेळी वाईटगोष्टीसाठी. गूगलने GoogleVOICE हे अॅप्लिकेशन अॅपलला जून २००९ मध्येपाठवले होते, पण ते iPhone Application Store मध्ये कधीच आले नाही; त्या ऐवजी एक वेगळेच अॅप्लिकेशन, GoogleVOICE सेवेसाठी देण्यात आले, जे गूगलने अधिकृत केलेले नव्हते. "अॅपलच्या प्रतिनिधीने सांगितले की, GoogleVOICE आयफोनच्या मूळ उद्देशालाच (voice calling) पर्यायउपलब्ध करून देते. जे कंपनीला परवडणारे नाही. " असे गूगलच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले होते. माझ्या मते, आयफोनसाठीची अॅपलची सहयोगी AT&T ने आक्षेप घेतल्यामुळे ते अॅप्लिकेशन नाकारण्यात आले, कारण त्यामुळे AT&Tच्या सेवेला पर्याय निर्माण झाला असता.

--गॅजेट-कीडा
(Friday, January 29, 2010)
------------------------------

                   (साभार आणि सौजन्य-गॅजेट कीडा.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                 (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  ----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.08.2022-बुधवार.