गॅजेट-कीडा-२००९ मागे वळून पाहताना-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, August 31, 2022, 09:27:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "गॅजेट-कीडा"
                                     -------------

     gadg.et.y-kee.daa - a unique species of human, which believes in something new every day.

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "गॅजेट-कीडा", या ब्लॉग मधील  एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "२००९ मागे वळून पाहताना"

                     "२००९ मागे वळून पाहताना"-लेख क्रमांक-2--
                    ---------------------------------------

६. ब्लॅकबेरी आता प्रत्येकासाठी - यावर्षी Storm आणि Storm2 सारखे Touch-enabled हँडसेट काढूनब्लॅकबेरीने, ईमेल फोन आणि स्मार्टफोन मधील दरी कमी करण्याचा चांगला प्रयत्न केला. इतकी वर्षे केवळउच्चभ्रू आणि अतिश्रीमंत वर्गाची मक्तेदारी राहिलेल्या ब्लॅकबेरीने या वर्षी, कमी किंमतीचे मॉडेल्सही उपलब्धकेले. ब्लॅकबेरी कर्व (curve) ने केवळ व्यावसायिकांसाठी असलेली ब्लॅकबेरीची प्रतिमा, हौशी वापरणार्‍यांसाठी ब्लॅकबेरी अशी केली.

७. पामटॉपसाठी आता webOS - पाम कंपनीने अखेर PocketPC शी असलेला संबंध अधिकृतरीत्या संपवूनस्वतःच्या webOS ची घोषणा केली. पाम प्री (Palm Pre) हे उच्च वर्गीय, Palm pixie हे मध्यम किंमतीचे मॉडेलआणून पामने आपली जागा नवीन वर्षासाठी पक्की केली आहे.

८. विंडोजमोबाईल संकटात - या सर्व हॅपनिंग वर्षामध्ये विंडोजमोबाईल ६.५ मात्र सपशेल आपटला. टचस्क्रीनसाठीचा वाढीव सपोर्ट, नवीन बनवलेला यूजर इन्टरफेस आणि नवीन फीचर्स असून सुध्दा ही आवृत्ती, तांत्रिक बाजूला कमी पडली. मायक्रोसॉफ्टची अपेक्षा आहे की २०१० मध्ये कमीत कमी ३० मोबाईल फोनविंडोजवाले येतील, यातील काही प्रसिध्द नावे जसे की तोशिबा, एसर, एचटीसी, सॅमसंग आणि एलजीइलेक्ट्रोनिक्स. पण विंडोजला जिवंत राहण्यासाठी बरेच हातपाय मारावे लागतील हे मात्र खरे!

९. सिंबियन आता OpenSource - ह्या सर्व गजबजाटात थोडासा दुर्लक्षित खेळाडू आहे, सिंबीयन. आता नोकीयाकॉर्पोरेशनचा भाग असलेली ही मोबाईल ऑपरेटींग सिस्टीम, आजघडीला सर्वात जास्त स्मार्टफोनला चालते. यावर्षी नोकीयाने सिंबियन फाउंडेशन स्थापन करून, या सिस्टीमला ओपनसोर्स केले आहे, ज्याने गेले पूर्ण वर्षसिंबियन मधील कमकुवत दुवे शोधून दुरुस्त केले आहेत. सिंबीयनबद्दल विकासकांची (developers) नेहमीचीतक्रार म्हणजे, अत्यंत अवघड प्रोग्रामिंग. अनेक वर्षाचा जुना आणि अनेक तुकडे (patch) जोडून उभा केलेला हा२००००० ओळींचा कोड आता नवीन मोबाईलसाठी थोडा जास्तच जड आहे. २०१० मध्ये तरी सिंबियनची ३rd Edition येईल अशी आशा.

१०. संगणकनिर्माते आता मोबाईल निर्मीतीमध्ये - HP IPAQ नंतर आता ACER पण मोबाईलच्या विश्वात उतरत आहे. ACERने 1GHz प्रोसेसरवाला जगातील सर्वात वेगवान स्मार्ट्फोन सादर करून बाजारात दमदारप्रवेश केला आहे. अशी बातमी आहे की DELL पण आपला कोणे एके काळी गुंडाळून ठेवलेला स्मार्ट्फोन प्रोजेक्टपुन्हा सुरु करतेय.

     वातावरण तापतेय हेच खरे..

--गॅजेट-कीडा
(Friday, January 29, 2010)
------------------------------

                  (साभार आणि सौजन्य-गॅजेट कीडा.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 ----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.08.2022-बुधवार.