प्रदीप पोवार-बलात्काराची बातमी-लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, August 31, 2022, 09:34:36 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "प्रदीप पोवार"
                                      --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री प्रदीप एस पोवार, यांच्या ब्लॉग मधील "त्याचं काय खरं नाही, थोडं इकडचं थोडं तिकडचं... " या सदरा-अंतर्गत  एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "बलात्काराची बातमी"

                      "बलात्काराची बातमी"-लेख क्रमांक-१--
                     ---------------------------------

     दिल्लीत चालत्या बसमध्ये मुलीवर बलात्कार करुन बाहेर फेकून दिले - अशी बातमी समजली. पाठोपाठ संसद, वृत्तपत्रे आणि टिव्हीवर विविध लोकांच्या प्रतिक्रिया पाहील्या. त्या निमित्ताने माझ्याही मनात कांही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माझ्या मनात पहिला प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे - दिल्लीमध्ये असा प्रसंग घडतो मग आपल्याकडे घडू शकणार नाही का ?

     या प्रश्नावर विचार करताना मला लगेचच कोल्हापुरात वृत्तपत्रातून सुरु असणारे सध्याचे "चालू प्रकरण" आठवले. ते आपल्या माहीतीसाठी देत आहे. हे प्रकरण जसेच्या तसे मला सांगता येणार नाही कारण तसे सांगणे हे बेकायदेशीर नसले आणि मी कायद्याला  घाबरत नसलो तरी पोलिसांना  नक्कीच घाबरतो.   कारण कोल्हापूर पोलीसांचा हिसका आम्हाला माहीत आहे. आपल्याला हे विषयांतर वाटेल पण हाच तर खरा चर्चेचा आणि काळजी करण्याचा विषय आहे.

     मागच्या महिण्यातले ऊसदर आंदोलन कसे "चिरडले" आणि शेतकरी कुटुंबातल्या सामान्य कार्यकर्त्यांना कसे "चिंबवले" हे कोण विसरेल ?  कांही गावातले तरूण तर पोलिसांच्या भितीमूळे गाव सोडून पाहूण्यांच्या गावी राहायला गेले आहेत.
"वरुन आदेश आहेत" या वाक्यावर एकाच शेतकरी आंदोलनकर्त्याला  पाच पाच गोळ्या घालण्यात आल्या. पण सांगलीत जिल्हापोलिसप्रमुख कृष्णकुमार यांच्या पोलिसजीपवर पाकिस्तानचा झेंडा नाचवून मुस्लिम दहशतीचा नंगानाच करणा-यांसमोर पोलिस चूप बसले होते, कारण वरुन आदेश होता. हेच कृष्णकुमार परवाच झालेल्या मुंबईतल्या (महिला पोलिस विनयभंगफेम) दंगलीच्यावेळी स्टेजवर उपस्थित होते. या दोन प्रसंगाचे कनेक्शन माझ्या लक्षात येत नाही. मावळचा गोळीबार असो की सांगलीचा,  पोलिस हे राजकारण्यांच्या हातचे बाहूलेच बनत चालल्याचे पुरावे आहेत. कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांना निषेधाचे झेंडे दाखविले म्हणून सध्याच्या गृहराज्यमंत्र्यांनी स्वत:च त्या पोरांना धरुन कुत्र्यासारखे बदडून काढले होते. उपस्थित असलेला कॉंग्रेसचा समुदाय वा पोलिस या कोणीही त्यात हस्तक्षेप केला नाही.  साधा शेतकरी असो विद्यार्थी असो त्यांचे आंदोलन चिरडून टाकायचे कारण त्यांनी उपस्थीत केलेले प्रश्न राजकरण्यांना अडचणीत आणतात. पण त्यामुळे त्यांच्या निवडून येण्यावर परिणाम होत नाही. बहुसंख्यांकाची आंदोलने चिरडणे हा एककलमी कार्यक्रमच सद्या सुरु आहे. बहुसंख्यांकाना कितीही झिडकारले तरीही निवडूणुका लागल्या की ते आपल्याच मागे येतात हे या राजकारण्यांना माहीत आहे. त्यांच्यासाठी प्रश्न आहे तो फक्त अल्पसंख्यांकाचा. पण हे लोक अल्पसंख्यांकांचे खरे प्रश्न सोडवतात काय? उत्तर आहे - कधीही नाही. हे लोक फक्त इतकेच करतात की अधूनमधून कुठेतरी जातीय तेढ निर्माण करायची त्यातून दंगल निर्माण करायची आणि आपण कसे अल्पसंख्यांचे रक्षण करतो हे दाखवायचे. खरे प्रश्न सोडवण्यासाठी जे लागते ते या लोकांकडे आहे काय?

     तसेच आपल्याकडे जातीय दंगली करणा-यांना वेगळी आणि ऊसदरासारखे आंदोलन करणा-यांना वेगळी ट्रिटमेंट असते. तेढ शब्दावरुन आठवले - इंदू मिल प्रकरण. कॉंग्रेसची इच्छा असती तर हा प्रश्न एकाच दिवसात सुटू शकला असता. बाबासाहेबांच्या स्मारकाचा वाद उगाच चिघळत ठेवायचा. त्यातून कुठेतरी कोणीतरी वाद निर्माण करायचा, उगाच घोळ घालायचा आणि मागासवर्गियांवर उपकार केल्यासारखे मगच तो प्रश्न संपवायचा.  यातून जणू हे स्मारक मागासवर्गियांसाठी आमच्या सरकारनेच भेट दिले आहे असा भास निर्माण करायचा आणि बहुसंख्यांकाच्या मनात उगाच हेवा निर्माण करायचा असा डाव होता पण तो तितकासा साध्य झाला नाही. सबंध महाराष्ट्राला त्याच्या हक्काचे स्मारक लवकरच पहायला मिळेल. आता मात्र हे विषयांतर झाल्यासारखे वाटत आहे.

--प्रदीप एस पोवार
(Wednesday, December 19, 2012)
--------------------------------------

                (साभार आणि सौजन्य-प्रदीप एस पोवार.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
              ---------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.08.2022-बुधवार.