प्रदीप पोवार-बलात्काराची बातमी-लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, August 31, 2022, 09:37:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "प्रदीप पोवार"
                                    -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री प्रदीप एस पोवार, यांच्या ब्लॉग मधील "त्याचं काय खरं नाही, थोडं इकडचं थोडं तिकडचं... " या सदरा-अंतर्गत  एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "बलात्काराची बातमी"

                     "बलात्काराची बातमी"-लेख क्रमांक-3--
                    ---------------------------------

     आता या प्रकरणातील एक एक गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. ती मुलगी स्वत: अविवाहीत असताना एका विवाहीत पुरुषाबरोबर संबंध ठेवते. रात्री अपरात्री कुठेही फिरते. हे धाडस तिच्यात कुठून आले. की आजची स्त्री खुपच मॉर्डन असून ती पुरुष्याच्या बरोबरीने सर्वकांही करु शकते हे तिला दाखवायचे आहे. बॉयफ्रेंड असणं हि फॅशन झाली आहे म्हणून कोणत्याही थराला जाऊन ती फॅशन केलीच पाहीजे का? आपण कांहीतरी थ्रि-लिंग करत आहोत याच भ्रमात राहातात आणि निस्तारण्याच्या वेळी आपण महिला आहोत याची आठवण होते. आपण बाहेर अपरात्री निर्जण ठिकाणी आहोत अशा ठिकाणी थांबत असताना सुरक्षेच्या दृष्टीने प्लॅन बी हवा की नाही?

     आजही तिचे नाव उघड होत नाही कारण ती स्त्री आहे आणि स्त्रीची अब्रू ही आजही तितकी रक्षणीय आहे म्हणूनच. पण ज्यावेळी या अशा उनाड मुली रात्री अपरात्री परपुरषांबरोबर बाहेर फिरतात त्यावेळी त्यांना याविषयी जाणिव असते का? त्यावेळी यांना फक्त आपलं मॉडर्न विचार आठवतात. नवनवीन फॅशन करणं, पिझ्झा, सॅंडविच खाणे म्हणजे मॉडर्न झालं का? विचारांनी मॉडर्न कधी होणार? स्वत: विषयी स्वत:च्या सुरक्षेविषयी जागरुक कधी होणार?

     आज त्या मुलीची, तिच्या लग्नाची, पालणपोषणाची जबाबदारी कायद्याने तिच्या पित्यावर आहे. त्याची या प्रकरणात काय चूक झाली की त्याला ह्यासर्वाला सामोरं जावं लागत आहे? त्याने त्या मुलीला मॉडर्न वागण्याची मोकळीक दिली हिच त्याची चूक झाली काय? अशी मोकळीक मिळते त्याचा विचारपुर्वक वापर करायचा की त्याच बापाच्या नाकावर टिच्चून असे बेकायदेशीर प्रकार करायचे. आणि वर म्हणायचे की आम्ही पुढच्या पिढीतल्या मुली?

     ती मुलगी विनयभंगाचा गुन्हा नोंदवायला तयार नव्हती कारण त्या पोलिसाबरोबरच तिचा प्रियकरही त्यात सापडला असता. त्यातूनही तिला तिच्या प्रियकराला वाचवायचे होते. आपला बाप पोलिस आहे याचा बडेजाव मित्र-मैत्रिणीवर मारता येतो पण गुन्हा नोंद करताना हेच कनेक्शन आडवे येते.  त्या पोलिसावर विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला तसाच या दोघांवरही व्यभिचाराचा गुन्हा नोंद व्हावा का?

--प्रदीप एस पोवार
(Wednesday, December 19, 2012)
--------------------------------------

               (साभार आणि सौजन्य-प्रदीप एस पोवार.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
              --------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.08.2022-बुधवार.