प्रदीप पोवार-बलात्काराची बातमी-लेख क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, August 31, 2022, 09:39:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "प्रदीप पोवार"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री प्रदीप एस पोवार, यांच्या ब्लॉग मधील "त्याचं काय खरं नाही, थोडं इकडचं थोडं तिकडचं... " या सदरा-अंतर्गत  एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "बलात्काराची बातमी"

                      "बलात्काराची बातमी"-लेख क्रमांक-4--
                     ---------------------------------

     काल दिल्लीप्रकरणावरुन सर्वजण म्हणत होते की बलात्का-याला फाशीची शिक्षा द्यावी. पण या कोल्हापूर प्रकरणात काय करायचे? जर त्या पोलिसालाच फक्त शिक्षा करायची म्हंटलं तर पुढच्या वर्षी वॄत्तपत्रात येणा-या बातमीचे हेडींग असे असेल - "विवाहाचे अमिष दाखवून पोलिसाच्या मुलीवर दोनवर्षे बलात्कार"- एका विवाहीत पुरुषाने एका पोलिसाच्या अजान मुलीस विवाहाचे अमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. कालांतराने ती मुलगी गरोदर राहील्याने आज हा प्रकार उघडकीस आला."

     अहो, खरं आहे. असंच होणार. आजचीच आणखी एक बातमी अशीच आहे. "लग्नाचे अमिष दाखवून दोन वर्षे बलात्कार". आणि आश्चर्य म्हणजे ज्या मुलगीने ही तक्रार दाखल केली आहे तीनेच दोनवर्षापुर्वी अशीच एक तक्रार दुस-या पुरुषाविरुध्द दाखल केली होती असंही त्या बातमीत आहे. कमाल आहे बातमी देणा-याची. या प्रकाराला बलात्कार असं कसं म्हणू शकता? एक तर याला "विवाहबाह्य संबंध किंवा अनैतीक संबंध" असं म्हणता येईल पण त्याला डायरेक्ट बलात्कार असं संबोधन बहुदा हे वृत्तपत्रवालेच देत असावेत. हे असं दोन दोन वर्षे बलात्कार कसं शक्य आहे? हां पैश्याची देवघेवीवरुन संबंध ताणले असावेत. पण ते वसुल करुन देण्यासाठी पोलिस त्या ठिकाणी बलात्कार असा गुन्हा नोंद करतात तर वरीलप्रमाणे सोईच्या ठिकाणी फक्त विनयभंग असा गुन्हा नोंदवतात. आणि पुरावा म्हणालतर तो दोन्हीकडेही नसतो म्हणजे शिक्षेचा प्रश्नच नाही.

     दिल्लीतल्या प्रकरणी म्हणाल तर ते प्रकरण आपल्या सर्वांना लाज आणणारे आहे. योग्य ते पुरावे गोळाकरुन प्रकरणाला कोणतेही फाटे न फोडता. आरोपींना शिक्षाही झालीच पाहीजे. नाहीतर आसामप्रकरणासारखे तारीख पे तारीख नको.  हा प्रकार म्हणजे दिल्लीतले सामाजिक फेल्यूअर हेही कारणीभूत आहे. असे प्रकार मात्र आमच्याकडे घडणार नाहीत असे वाटते, कारण आपल्याकडे आजूनही समाजपुरुष जिवंत आहे जो आया बहिणींचे रक्षण करण्यास समर्थ आहे. जोपर्यंत आमच्याकडे गुन्हेगारांना हिनतेचीच वागणूक मिळत राहील तोपर्यंत लोक गुन्हेगारीकडे वळण्यास धजावणार नाहीत.

                       फाशीच्या शिक्षेबद्दल--
 
     गुन्हा नोंदवताना तो विनयभंग की बलात्कार, अनैतिक संबंध की शरीरविक्रेय या बाबी ज्ञानवंत, प्रामाणिक पोलिसांच्याच हातात असतात तेव्हा गुन्हा नोंदवणे, त्याला पुरावे देणे, तो शाबीत करणे हे तो फुकट करेल का हाच खरा प्रश्न आहे. प्रत्तेक गोष्टीत आंबा पाडणा-या पोलिसांकडून ती अपेक्षा करता येईल का?

     जर गुन्हा नोंदवण्यापासूनच जर असंख्य फाटे फुटत असतील तर बलात्का-याला फाशीच्या शिक्षेचा कायदा होऊन तर काय उपयोग? कारण जे कायद्याला घाबरतात ते गुन्हाच करत नाहीत. आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्या पाठीशी . . . . . . . कायद्याच्या पळवाटा आणि त्या वाटा दाखविणारे वाटाडे.

--प्रदीप एस पोवार
(Wednesday, December 19, 2012)
--------------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-प्रदीप एस पोवार.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                  (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                --------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.08.2022-बुधवार.