अनुभव-निकालाचा गोंधळ ...

Started by Atul Kaviraje, August 31, 2022, 09:42:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "अनुभव"
                                       ---------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री राहुल टकले, यांच्या ब्लॉग मधील "अनुभव" या सदरा-अंतर्गत  एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "निकालाचा गोंधळ ..."

                               निकालाचा गोंधळ ...
                              ----------------

     बहु प्रतीक्षित आयोध्या प्रकरणाचा काल निकाल लागला . आयोध्येच्या निकालाच्या वेळी पुन्हा bahrtiyani आपण बेशिस्त आहोत हे दाखवून दिले. निकाल आल्या आल्या काही वकिलांनी stage वर गर्दी केली . v चे साईन दाखवत गोंधळ करू लागले . जसे काय हे सगळे निवडूनच आले आहेत .काही मान्यवर लोकांनाही निकाल सांगण्यासाठी मेडिया समोर येण्याची धावपळ , काही लोकान्हे तिथूनच mobile वर बोलणे.

     मेडिया वाल्यांचा गोंधळ तर काही विचारायलाच नको. त्यांना कुठल्याही प्रकारची शिस्त लावता येणे अशक्य .पोलिसांनी २-३ फटके लावले असते तर शांत बसले असते.पण मेडिया वाले "धरले तर चावतंय ,सोडले तर पळतंय " असा प्रकार असतो . पूर्ण निकाल वाचून झाला तरी कुणालाही काहीहि समजले नव्हते .

     हेच जर आल्यावर सगळे लोक व्यवस्थित शांत बसले असते . एकाच प्रवक्ता stage वरून बोलला असता तर चांगले दिसले नसते का ? मेडिया ने हे तरी लक्षात घ्यायला हवे कि हे video सगळ्या जगात दाखवले जातात .थोडे तरी वर्तन सुधारा ..जावब्दारीने वागायला शिका .या सर्वाना सद्बुद्धी दे ही प्रभू राम. चंद्राचरणी प्रार्थना !!

--राहुल टकले
(Friday, October 1,2010)
----------------------------

        (साभार आणि सौजन्य-टी.राहुल-राहुल एक्सपेरियन्स.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
       ------------------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.08.2022-बुधवार.