मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-60

Started by Atul Kaviraje, September 01, 2022, 08:15:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 मला आवडलेल्या चारोळ्या
                                    चारोळी क्रमांक-60
                                -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --ही  चारोळी , वरवर  दिसायला , वाचायला  विनोदी  दिसतेय  खरी , पण  जीवनाचे  सारं  काही  सार  ती  सांगून  जातेय . कोणालाही  संकटात  ढकलायला  सारे  जण  उत्सुक  असतात . बहुधा  अशा  परिस्थितीत  पुढाकार  घ्यायचे  टाळून  ते  भलत्यालाच , दुसऱ्यालाच  पुढे  पुढे  करतात , आणि  आपण  मागे  राहून  त्याची  धावपळ , मजा  पहातात . काही  वेळेला  विनोदाने  असंही  म्हटलं  जातं , " तू  हो  पुढं , मी  आहे  तुझे  कपडे  सांभाळायला ". वास्तविक  जीवनात  ही  चारोळी , मोठा  गहन  अर्थ  सांगून  जाते . मजाक  मजाक  मध्ये  लोक  असं  म्हणून  जातात , पण  जेव्हा  खरी  परिस्थिती  उद्भवते , तेव्हा  त्यांचा  मजाक  त्यांचे  तोंडीच  राहतो .

     नवं-चारोळीकारास  बहुधा  जीवनात , आयुष्यात  भेटलेल्या  अनेक  लोकांचा  भला-बुरा  अनुभव  आल्याचे  या  चारोळीतून  जाणवत  आहे . तो म्हणतोय , वाचकहो , मित्रांनो , आपल्या  आयुष्यात  आपल्याला  अनेक  ओळखीची , अनोळखी  अशी  माणसे  भेटतात , जी  काही  आपली  असतात , आणि  दुसरीही, परकीही असतात . आपल्याबरोबर  राहून  ती  आपल्याला  मदत  करण्याचे , आपल्यासह  चालण्याचे  भासवतात . आपले  काम  झाले , आपला  स्वार्थ  साधून  झाला  की  मग , सहज  तोंडाला  पाने  पुसून  अंतर्धान  पावतात . चक्क  पळ  काढतात . अश्या  ढोंगी , आप-मतलबी ,संधीसाधू  , कपटी  लोकांपासून  नेहमी  सावध  राहा , असा  मोलाचा  सल्ला  आपणास  हा  नवं-चारोळीकार  देऊन  जातो .

     पुढे  तो  म्हणतोय , की  मित्रांनो  त्याला  कारणही  तर  तसेच  घडलंय . अनेक  संकटाना  सामोरे  जातं  तर  हे  आयुष्य  घडतं  असतं . तर  मुद्दा  हा  की , माझ्यावरही  अशी  अनेक  संकटे  आली  होती . मलाही  अनेक  भीषण , अटळ  स्थितीला  तोंड  देणं  भाग  पडलं  होतं . अश्या  वेळी  मी  जोडलेली  माणसे , ज्यांच्यावर  माझा  विश्वास  होता , भिस्त  होती , मदार  होती , अश्या  या  लोकांनी  चक्क  पुढे  येण्यास , मला  मदत  करण्यास  टाळाटाळ  केली . ती  म्हणत  होती , की  पुढे  तर  हो , आम्ही  आहोतच  पाठी  तुला  मदत  करायला . पण  मित्रांनो , अशी  ही  लोक  माझ्या  मदतीस  केव्हाच  नव्हती  आली , ती  शेवटपर्यंत  मलाच  पुढे  करत  स्वतः  पाठीचं  राहिली  होती .यावरून  मी  एक  धडा  शिकलोय , की  आयुष्यात  आपण  कितीही  माणसे  जोडली , तरी  आपल्या  संकटकाळी   कुणीही  आपल्या  मदतीस  येत  नाही . आपणास  पुढे  करून  वर  म्हणतात  की , तू  हो  पुढे , आम्ही  आहोतच  पाठी  तुला  मदत  करायला . आणि  हे  असं  बोलणारी  माणसे  कधीच  पुढे  येऊन  मदतीचा  हात  देत  नाहीत . आपली  संकटे  ही  आपणासच  झेलावयाची  असतात . या  कठीण , बिकट  स्थितीतून  आपणासच  मार्ग  काढावयाचा  असतो . हे  सर्व  नावाला  असतं , पण  शेवटी  माणूस  हा  एकाकी , एकटा  असतो . एकट्यानेच  जीवन  जगत  असतो , आणि  त्याला  आयुष्यातील  पुढचा  मार्गही  एकट्यानेच  चालायचा  असतो,  एकट्यानेच  मार्ग-क्रमण  करायचे  असते .

===================
तू चल पुढं मी तुझ्या आहे माग
असं म्हणतात काही लोक
कितीही संकट आली आयुष्यात
तरी तुला एकट्यानेच भिडायच आहे बघ
===================

--नवं-चारोळीकार
-----------------

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ स्टेटस.एंटरप्रुनरशीप.कॉम)
                -------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.09.2022-गुरुवार.