राजा......जिंकेल सगळ्यांचे मन.....-मैत्री

Started by Atul Kaviraje, September 01, 2022, 08:37:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              "राजा......जिंकेल सगळ्यांचे मन....."
                             ----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री दिलीप खडसे, यांच्या "राजा......जिंकेल सगळ्यांचे मन....." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "मैत्री"

                                 मैत्री--
                                -----

     महाविद्यालय म्हटले की कट्टा,कँटीन आणि मैत्री हे आलच त्यामध्ये आणखी काही वेगळे ठरनार नाही.काँलेजच्या विश्वामध्येच तरुणाईचा खरा जॊश आणि ध्येय गाठण्याचे स्वप्न दिसतात.या विश्वात कोणाला जिवनसाथी मिळतो तर कोणाला निखळ अशी मैत्री पण ज्याला या विश्वात मित्र नाही त्या सारखा दुर्दैवी कोणीच नाही असे मी म्हणेन.

      जी गोष्ट आपण घरी आई-वडीलांना सांगत नाही ती गोष्ट आपण मित्र-मैत्रीणी पुढे अगदी मोकळ्या मनाने मांडतॊ.सुख-दु:खात साथ देणारा ज्याच्या सोबत मनाचे नाते जुळलेले असते त्याला मित्र म्हणून संबोधले जाते.बालमनापासुन आपल्यामध्ये मैत्रीचे झाड रुजले जाते.आणि आयुष्यात पुढे जाता-जाता त्याला बहर येतो.पण त्याला खरा बहर तरुणाईतच फ़ुटतो.

     या बहरलेल्या मैत्रीतील फ़ुलांचा सुगंध हा आयुष्याच्या शेवटा पर्यंत दरळवत राहतो.
तरुणाईतील सर्व आठ्वनी हृदयात दडल्यागेलेल्या असतात.त्या आठवनी जेव्हा बाहेर येतात तेव्हा डोळ्यातुन पाणी झिरपू पाहते.निष्पाप आणि निरागस प्रेम मैत्रीने व्यापलेले असते.

     मैत्रीला रुसवा आणि भांडणांची एक फ़ोडणी दिलेली असते.त्याशिवाय मैत्री मध्ये खरी
मजा येत नाही.मैत्री जणू हे संपुर्ण विश्वच आपल्याला व्यापून देते.आपण जे छंद जोपासतो तिही एक त्याबरोबर केलेली मैत्री असते. मोठ्यालोकांपIसुन ते लहानापर्यंत मैत्री सगळ्यांना हवी-हवीशी वाटते.तरुणांमध्ये प्रेमापेक्षाही जास्त भावेल असे नाते मैत्रीचे असते.मैत्री विषई जेवढं लिहावे तेव्हढ कमीच आहे.

     कारण मैत्री हे भावनांच्या चौकटीपलीकडचे एक नातं असते.मैत्री असते एक बांधलेला किल्ला जो की सदैव मनामध्ये त्याची जागा बनवून ठेवतो व इतीहासाआड कितीही लपला तरी एके दिवशी सर्व आठवणीसह समोर येतो. आपल्या मनातील अनेक विचार मनातील ताण आणि अनेक प्रश्नांचे उत्तर म्हणजे मित्रच असतो.अनेक वेळा तोच अचूक मार्गदर्शन करुन आपल्याला आपल्या ध्येया पर्यंत पोहचण्यास मदत करतो.मित्रामुळे आपल्या अनेक वाईट सवई आपल्यापIसुन दुरावतात.

     मित्राचा खजीना भेटल्यावर कोणीही दुसरा खजीना सापडण्याच्या मागे लागत नाही.
कारण याच खजीन्याच्या सहाय्याने अनेक शिखरे गाठता येतात.मैत्रीमध्ये अनेक गोष्टी शब्दांनी व्यक्त करता येत नाही पण त्यामध्ये फ़क्त नेहमी सोबत राहण्याची खात्री दिले जाते.यामध्ये दुसर्‍याच्या आनंदाचा विचार केला जातो.यामध्ये कोणतेही भय नसते जो हा ठेवा जपून ठेवतो तो आयुष्यात कधीही मागे रहात नाही.

               मैत्री म्हणजे प्रेम
                                    मैत्री म्हणजे जाणीव
               मैत्री शिवाय जिवनात
                                    आधाराची उणीव
               मैत्री म्हणजे विश्व
                                    मैत्री म्हणजे आकाश
               मैत्री म्हणजे जिवनात
                                     वाट दावणारा प्रकाश

--दिलीप खडसे
--------------

                  (साभार आणि सौजन्य-दिलीप खडसे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                 (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 -----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.09.2022-गुरुवार