इल्लूसं-पिल्लूसं ...-अजूनही तुझा आवाज कानात घुमतोय बघ...

Started by Atul Kaviraje, September 02, 2022, 09:11:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "इल्लूसं-पिल्लूसं ..."
                                     -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "इल्लूसं-पिल्लूसं ..." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "अजूनही तुझा आवाज कानात घुमतोय बघ..."

                      अजूनही तुझा आवाज कानात घुमतोय बघ...--
                     ----------------------------------------
 
'बाकी सर्व खुशाल...तुझ्यासारखं...'
DeaR आलं यातच सारं, नाही का?
असो...
मला एक सांग कशी दिसत असशील गं आता...
खात्री आहे....तशीच असशील... 'माझी वाली'
.....निरागस, कावरी-बावरी....
कृत्रिम रंगाचा स्पर्श.... त्याची तुला कधी गरजच भासली नव्हती .....
आणि आताही ......हो खात्री आहे शंभर टक्के...
समोरच्याच्या आत्म्याला भिडणारी तुझी नजर ...अजूनही काळजात जपून ठेवलीय....
बराच काळ लोटून गेलाय असं वाटतं....नाही का गं....
कित्येकदा तुझ्या दारातून परतलोय....सातासमुद्रापार असलेल्या...
रोज दिवसभरात माहित नाही किती चकरा होतात....
मी मोजत नाही गं....पूर्वीसारखे हिशेब जमत नाहीत हल्ली....
तू फक्त एकदा दिसलीस कि होईल सर्व वसूल.......फक्त एकदाच
तुला आज पण असंच वाटतं का गं झालं ते सर्व माझ्यामुळे?
त्या दिवशी तुझ्या बोलण्यातून जाणवत होतं ते मला...
वाटलंच.....कधी भेटलेलीस? एवढा विचार नको करूस....
आता भेटते आहेस तशी गं...
तू भेटतच असतेस मला माझ्या विचारांमधून, स्वप्नांमधून....तर असो 
रागात पण गोड दिसतेस, आजपण...   
अगं हो हो DeaR .....किती त्रागा करून घेशील....
चुकलंच माझं...मोजायला हवं होतं.... तुझ्या-माझ्यातलं अंतर, ते अंतर कापण्यासाठीचा वेळ, मारलेल्या चकरा...
तुझ्या आठवणी, रात्रींचे दिवस, हरवलेले क्षण, गुदमरलेले श्वास, कोंडलेले शब्द, नरक-यातना.....अजूनही बरंच काही...
जमलंच नाही बघ अगणित कसं मोजायचं ते....
हिशेबांना जरा डोके लावले असते तर .....
पण छ्या .....प्रेमात डोकं कमीच लावलं......असं तुझं म्हणणं....
वेडाबाई ....मनात तुझ्या कधी डोकावलो नाही मी......?
फक्त मान उंचावून तुला बघत राहिलो....
अगदी खरं सांगतोय.....आज पण तिथूनच बोलतोय.....तुझ्या मनासारखी प्रशस्त जागा कुठेच नाही....
सात समुद्रापार माझा आवाज पोहोचतोयना .....
आणि ते सात असू देत कि सात हजार, फरक पडेल का???
आणि जखमांचे काय घेऊन बसलीस DeaR?
जखमा होतात त्या शरीराला, तुटलेल्या भागाचे काय ..... निर्जीवच
केला ना माझा जीव दुसऱ्याच्या स्वाधीन?
आपल्यामध्ये समुद्र आणले नाही गं DeaR मी .....ते यायचेच होते......
विरहाचे म्हणशील तर.... शरीरापुरते .......समुद्र दोन शरीरांमध्ये आलेत.....
आजही मी पाहतोय गं तुला....शेवटचे कोणते ठरेल माहीत नाही......
जाणून घ्यायचेही नाही....
- फक्त तुझाच 
शेवटच्या श्वासापर्यंत...त्यानंतरही...

--शIशI
(Sunday, December 26, 2010)
----------------------------------

                (साभार आणि सौजन्य-इल्लूसं-पिल्लूसं.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
               -------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.09.2022-शुक्रवार.