मैत्रेय-१९६४-त्याची गोष्ट-ब

Started by Atul Kaviraje, September 02, 2022, 09:27:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "मैत्रेय-१९६४"
                                    -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री देवेंद्र मराठे, यांच्या "मैत्रेय-१९६४" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "त्याची गोष्ट"

                                       त्याची गोष्ट--ब
                                      --------------

(ऎकलस का बयो )
ती : बोल ना रे ? मला उशिर होतोय.
(म्हणजे तुला काहीच बोलायचं नाही तर.......)
" निघतेस....... "
( बोलण्याची तुला इछ्छाच दिसत नाही की.......)
( तुला काय ही एकपात्री एकांकीका वाटली का? )
ती : जायला हवं रे. खरच...
(न बोलताच निघतेस.... का बरं... खरचं तुला काहिच बोलायच नाही का ? हे तरी स्पष्ट बोल ना बयो )
ती : जाते रे.

     (जातो नाही येतो म्हणाव अस तुच म्हणायचीस ना ? विसरलीस ... तुझच जर विसरलीस मग माझ काय लक्षात ठेवशील ............... )
ती : जाते ना.. प्लिज.
ती : रिक्शा
ती : बाय

     (नेहमी प्रमाणे " भेटु या " पण नाही)
आपण आज जे भेटलॊ त्याला भेट का बर म्हणायच ?मी बोललो ते तुझ्यापर्यंत पोहोचल नाहीच आणि तुला जे (कदाचीत) बोलयच ते तु बोललीच नाहिस.पण मन मात्र सांगत होत.खुप काही तुटलय ... खुप काही..
न सांगता येण्यासारख .... न जोडता येण्यासारख.
घरी आलो. शांत. मयताला जाउन येतात तसं ................... .भरपुर जेवलो पण मुकाट्याने .म्हणतात मन दुखावलेलं असेल तर जेवण जास्त जातं.
माझ्या खोलीत गेलो. मोबाईल काढला...... ईयरप्लग कानात टाकले..( खरं सांगायला हरकत नाही..एकदा असं वाटत होत की चांगले चार-पाच जुन्या साधुचे .. ओल्ड मॉंकचे पेग मारावेत म्हणजे बेसुध झोप येइल. पण त्याने शरिर झोपलं असत पण उससे "दिल" का क्या होता ? )
तु नव्हतीस पण माझा जगजीतसिंग तर माझ्या सोबत होता (.........असेल... आणि नेहमीच राहील)
आता मात्र रात्रिच्या शांत वातावरणात त्याचे मखमली स्वर कानातुन मनात अलगद उतरत होते.
एकामागून येक.......

कभी खामोश बैठोगे ...कभी कुछ गुन गुनाओगे.
मै उतना याद आउंगा ,मुझे जितना भुलाओगे....
कोई जब पुछ बैठेगा खामोशी का सबब तुमसे
बहोत समझाना चाहोगे ,मगर समझा ना पाओगे
मै उतना याद आउंगा ,मुझे जितना भुलाओगे....

कभी दुनिया मुक्कमल बनके ,आयेगी निगाहोमे
तभी मेरी कमी दुनियाकी हर ऎक छैय मे पायोगे
मै उतना याद आउंगा ,मुझे जितना भुलाओगे....

कही पर भी रहे हम-तुम, मोहोब्बत फ़िर मोहोब्बत है
तुम्हे हम याद आयेंगे, हमे तुम याद आयोगे
मै उतना याद आउंगा ,मुझे जितना भुलाओगे....

     जगजीतसिंगचे स्वर अंगाई सारखे हळुहळु मनात झिरपत होते. मनाची तगमग कमी होत गेली. ते स्वर सांगत होते मी आहे तुझ्या बरोबर..... तेव्हा चालत रहा............ चालत रहा.
जगजीतसिंगच फ़क्त माझ्यासाठीच गातच होत............

कभी गुन्छा , कभी शोला ,कभी शबनम की तरहा
लोग मिलते है बदलते हुवे मौसम की तरहा............

--देवेंद्र मराठे
(७ जून, २००९)
--------------

                 (साभार आणि सौजन्य-मैत्रेय-१९६४.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                              (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                ----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.09.2022-शुक्रवार.