मराठी चित्रपट-धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे-आनंद हरपला…

Started by Atul Kaviraje, September 03, 2022, 09:48:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, श्री आनंद दिघे, शिवसेनेचे माजी धडाडीचे कार्यकर्ते यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट "धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे", या चित्रपटातील त्यांच्या दुःखद निधनावर मन हेलावून टाकणारे एक करुण-गीत. या गीताचे बोल आहेत- "आनंद हरपला..."

     Aanand Harpala lyrics from Dharmveer Marathi Movie by Pravin Tarde. Anand Harpla Song Lyrics by Mangesh kangane, Music by Chinar-Mahesh and Sung by Saurabh Salunke. Starring Prasad Oak, Kshitish Date & Makarand Padhye

                                     "आनंद हरपला..."
                                    -----------------

मुखात सुखाची साखर ठेवून
जोडली जन्माची नाती
रामाच्या रुपात जपला माणूस
मारुतीरायाची छाती

वाघाची लीला नि कपाळी टिळा
तू उजेड अंधारासाठी
भनक भीतीची नव्हती भवती
आभाळ रे माझ्या पाठी
देऊन किनारा मनाच्या होडीचा
सारंग हरवला..
माझा आनंद हरपला...

नाराज नशीब घेऊन एखादा
जन्माला आलेला कुणी
पडली नजर तुझी ज्याच्यावर
अखंड राहिला ऋणी...

विसर पडावा घडू नये कधी
जिव्हारी जिवंत जाण
दारात तुळस कौलारू कळस
देव्हाऱ्यात तुझा मान...
दिनांचा देव्हारा सोडून मोकळा
श्रीरंग परतला..
माझा आनंद हरपला... ||१||

देऊन कान तू ऐकली गाऱ्हाणी
सदैव देवाच्या आधी
सवाल छळतो आता मी कुणाला
दाखवू नवस यादी...

वार सणवार रेखीव रांगोळी
दारात सजेल जेव्हा
वादळ होऊन तुझी आठवण
दाटून येईल तेव्हा..
घराघरातला उंच थरातला
गोविंद हरवला..
माझा आनंद हरपला... ||२||

वाऱ्याला खुपली आनंद झुळूक
विझला तेजाचा दिवा
असाच उजेड देणारा दिवा
तो आणील कुठून नवा

येतील जातील देणारे हात
तू तिथेही उजवा देवा
गाय-गरीबाची बात नको
तुझ्या वैऱ्यास वाटेल हेवा
देऊन भरारी आभाळा पल्याड
पतंग सरकला..
माझा आनंद हरपला... ||३||

==================
चित्रपट – धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे 
गायक  – सौरभ  साळुंके
म्युझिक  – चिनार – महेश
गीतकार  – मंगेश  कांगणे
कास्टिंग-- प्रसाद ओक, क्षितिष दाते
              आणि मकरंद पाध्ये
म्युझिक  ऑन – झी म्युझिक मराठी
==================

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-सॉंग लैरिसिस्ट.कॉम)
                --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.09.2022-शनिवार.