चारोळी पावसाची-क्रमांक-44-जगण्याची उमेद देणारा पाऊस

Started by Atul Kaviraje, September 04, 2022, 08:38:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    चारोळी पावसाची
                                      क्रमांक-44
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --कवयित्रीचे  भाव-विश्व  काहीसे  वेगळे  आहे .आगळ्या  वेगळ्या  चारोळ्या  कवयित्रीला  नेहमीच  स्फुरत  असतात . त्यापैकीच  ही  एक  आहे . तिला  जीवनाचा  अर्थ  आता  इतक्या  वर्षांनी  पुरेपूर  कळला  आहे . जीवन  जगण्याची  खरी  व्याख्या  तिला  उमगली  आहे . जीवनाचे  सारं  ती  समजून  चुकली  आहे . त्याच  त्याच  जगण्याला  ती  आता  कंटाळली  आहे . तीच  तीच  माणसे , तीच  तीच  ती  लोकं , तिच्या  आयुष्यात  आलेली  तीच  तीच  नाती-गोती , हे  तिला  आता  असह्य  झाले  आहे . तिला  आता  काहीतरी  नवं  हवंय . ज्यासाठी  ती  आजपावेतो  प्रतीक्षेत  आहे . तिची  नव्याची  वाट  पहाणं  अजूनही  सुरु  आहे . ते  तिला  मिळेल  का  ?

     ती  पुढे  म्हणतेय , तेच  तेच  रटाळ  जीवन  जगता  मी  कंटाळून  गेलेय . माझी  मती  कुंठित  झालीय . मी  दुसरा  कसलाही  विचारच  करू  शकत  नाही . हे  जगणं  मला  आता  अतिशय  निरर्थकच  वाटू  लागलाय . या  माझ्या , आपल्या  जगण्यात  काहीही  अर्थ  नाहीय . रामचं  उरलेला  नाहीय . काहीतरी  नवीन  हवंय . मला  काही  नवीन  घडण्याची  आशा  आहे  , उमेद  आहे . मी  नाविन्याची  आस  बाळगून  आहे . काहीतरी  दिसावं , घडावं  याच  अपेक्षेने  मी  पुढचे  दिवस  कंठतेय . तुही  मला  ते  शोधण्यास , काहीतरी  नवीन  दिसण्यास , असण्यास  मदत  कर . तुला  नाही  का  या  जीवनाचा  कंटाळा  आलाय ?

     इतकं  ती  म्हणतेय  खरं , पण  तिची  जगण्याची  आस , उमेद  काही  कमी  होत  नाहीय . आणि  ती  आस  तिला  दिली  आहे , या  पावसाळ्याने , पडणाऱ्या  पावसाच्या  पाण्याने . ती  म्हणतेय , या  जगण्यात , आपल्या  जीवनात  काही  अर्थ  नसला , तरी  पहा , तो  दरवर्षी , दरसाली  येणारा  पावसाळा  आपणास  पुन्हा  नव्याने  जगणे  शिकवत  आहे . नव्याने  जगण्याची  उमेद  देत  आहे . तो  पडताना  म्हणतोय , की  तुम्ही  जगण्याची  आस  सोडली  तर  तुमचे  कसे  काय  होईल  बरे ? तेव्हा  नाउमेद   होऊ  नका . हेही  जीवन  तुमचे  बदलेल . तुम्हालाही  नवे , चांगले , यापेक्षाही  भले , उत्तम  दिवस  येतील . जगण्याची , जीवनाची  आस  तुम्ही  कधीही  सोडू  नका . माझेच  पहाना , नित्य-नियमाने  मी  दरवर्षी  न  चुकता  येतो , बरसतो , आणि  तुम्हाला  एक  नवं-जीवन  देतो . मी  कालही  पडत  होतो , आजही  पडतोय , आणि  उद्याही  पडेन . माझ्या  या  जिवंत  असण्याने , माझ्या  अस्त्तित्वाने  तुम्हीही  काही  बोध  घ्या , धडा  घ्या , काहीतरी  शिका , व  तुम्हाला  मिळालेले जीवन खऱ्या अर्थाने  जगा .

   जगण्याची उमेद देणारा पाऊस
  ---------------------------
जगण निरर्थक आहे,
यात कुठला अर्थ आहे,
शोधुनी बघ तु जरा,
विश्वात पावसाळा अजून जीवंत आहे......
===================

--कवयित्री:साक्षी कांबळे
---------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विश मराठी.कॉम)
                  ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.09.2022-रविवार.