मनमौजी-विकेट पडली!!!!!--लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 04, 2022, 09:08:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "मनमौजी"
                                     ----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री योगेश यांच्या "मनमौजी" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "विकेट पडली!!!!!"

                           विकेट पडली!!!!!--लेख क्रमांक-१--
                          ------------------------------

     2009 मधील सर्वात अविस्मरणीय घटना म्हणजे माझी विकेट पडली. नाही समजलात अहो जिच्या शोधात जे काही भन्नाट कांदे पोहे पचवले ती अखेरीस सापडली.दिवाळी पाडव्याच्या दिवशीच आमची विकेट पडली अन् ती ही अगदी नाट्यमयरीत्या. तशी ही पोस्ट मी त्या दरम्यानच करणार होतो पण म्हणल एवढी महत्वाची ही घटना वर्षाअखेरीस ब्लॉगवर टाकु या. (महेन्द्र काका कस वाटल ब्लॉग न लिहीण्याच कारण ?? :) )

     दिवाळीला समस्त कामगार वर्ग सुट्टी ला गेल्यामुळे स्लॅबवर पाणी मारण्याच काम माझ्याकडे आल होत. दिवाळी पाडाव्याच्यादिवशी अभ्यंग स्नान झाल्यावर नेहमीप्रमाणे पाणी मारण्यासाठी मी साईटवर पोहचलो, तोच ताई चा फोन आला " तू तिथेच थांब तुला घ्यायला माई (माझी मोठी बहीण)व जीजु येत आहेत अन् त्याच्यासोबत तुला मुलगी पाहायला जायचाय."मी काही प्रतिक्रिया देइपर्यंत पुढील वाक्य अस बाबानी सांगितलय. बस तीर्थरुपांचा आदेश म्हणल्यावर काय बोलणार आम्ही??? बाबा कुठे आहेत विचारल तर ते पुढे गेलेत तुम्हाला ते तिथेच भेटतील. . .आता मात्र जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता.

     स्लॅबवर पाणी मारायला आलो असलो तरी पण योगा योगाने जरा ठीक ड्रेस होता त्यामुळे अवतार जरा बरा होता.थोड्याच वेळात जीजू आले अन् आम्ही निघालो. साइटपासुन साधारण 15 की.मी. वर तीच गाव होत. आम्ही तिथे जाण्यागोदर रस्त्यात बाबा अन् काका ( ज्यानी हे स्थळ सुचवल ते ) हे भेटले, त्यांच्याकडुन समजल की अजुन अर्धा तास थांबाव लागेल कारण तिथे अगोदरच दुसरे पाहुणे पाहण्यासाठी आलेले होते. थोड्या मिस कम्युनिकेशन मुळे हा गोंधळ झाला होता.त्यांना पण खूप चुकीच वाटत होत पण ते तरी करणार काय?? ते पाहुणे गेले की सांगा मग आम्ही येतो अस सांगुन आम्ही आमच्या परीचयाचे एक स्नेही तिथे जवळच राहतात तिकडे गेलो.

     बाबा थोडे बाजूला जाताच ,आमचा मराठी बाणा जागा झाला. माई जवळ थोडासा राग म्हणजे निषेध व्यक्त केला (कसा केला असेल ते समजून घ्या). मी जातो, तुम्ही बघून घ्या, माझा मूड गेलाय, मी नकारच देणार ई.ई. . . .अस माझ चालू होत तोच आमचे तीर्थरुप आले फक्त त्यांनी माझ्याकडे पाहील अन् विचारल काय झाल काही अडचण आहे का?? थोडा समजूतदारपणा दाखव. . .बस्स संपल पुन्हा एकदा बोलती बंद, ढान्या वाघाच मांजर झाल होत!!!

     तब्बल पाउण तासाने त्यांचा फोन आला मग आम्ही निघालो. तो पर्यंत ब्लॉगवर यावर काय खरडायच याचाच विचार करत होतो.ह्या मुलीला नकार द्यायचा असा दृढ निश्चय करून निघालो. फक्त केलाच नाही तर तो माई अन् जीजू जवळ बोलून पण दाखवला.

     शेवटी आम्ही त्यांच्या घरी पोहचलो माझा मूड नसल्यामुळे मी अगदी शांत होतो. सुरुवातीला कश्यामुळे गोंधळ झाला, तसदीबद्दल क्षमस्व,आमची ओळख परेड इ. झाल. त्यानंतर मग मुलीला बोलवल. . .आलोच आहे तर बघू या. . . .अश्या प्रामाणिक हेतूने एक चोरटा कटाक्ष टाकला. . बस्स काय झाल माहीत नाही लेकीन आपून के दिल की घंटी बजी!!! मनातून अस वाटल यार हीच ती!! जिला आपण शोधतोय ती हीच. . .(आता झाली का गोची!!! :)) आयुष्यात पहिल्यांदा अस फिलींग आलI होत.

     बाबा अन् जीजू यांनी थोडे प्रश्न विचारले, आता वेळ होती माझी. . .मी काय विचारू?? अगदी भोळा भाव दाखवून मी म्हणालो ( मनातून तर मला फक्त तिच्याशीच बोलायच होत) शेवटी तुम्ही दोघे बोला आम्ही सगळे बाहेर जातो अस सांगुन सर्व जण बाहेर पडले. . मनातून तर लाडू फुटत होते. . चला आता बोलता येईल अस वाटल. . . पण हा आनंद फार काळ नाही टिकला. . कारण तिचा भाउ अन् तिचे काका हे समोरच येऊन बसले अन् त्यानंतर ही आली.

--योगेश
(2009-12-30)
----------------

                   (साभार आणि सौजन्य-मनमौजी.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  -------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.09.2022-रविवार.