मनमौजी-विकेट पडली!!!!!--लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 04, 2022, 09:10:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "मनमौजी"
                                     ----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री योगेश यांच्या "मनमौजी" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "विकेट पडली!!!!!"

                           विकेट पडली!!!!!--लेख क्रमांक-2--
                          -------------------------------

     आता काय बोलणार?? तिच्याशी बोलण्याअगोदरच बंधुराज सुरू झाले काय करता, डिग्री कुठे झाली. कॅड मॅनेजर आहे म्हणल्यावर मग आमच्या त्यावरच जास्त गप्पा झाल्या.तिच्याशी फक्त एकदाच बोललो. साधारण 15-20 मिनिटानी आमच्या गप्पा संपल्या अन् ते ही तिच्याशी काही न बोलता.

     आम्ही बाहेर पडताना माझा दृढ निश्चय अगदी कोलमडून पडला होता. बाबा, माई, जीजू गालातल्या गालात हसत होते कारण आता त्यांना मी सापडलो होतो.निघाल्यानंतर थोड्यावेळाने तीर्थरुप म्हणाले तर मग काय नकार कळवुन टाकतो. तू तर तेच ठरवल होत ना?? यावर मी शांत झालो खाली मान खालून आपला गप्प बसलो. . .काही बोलाव म्हणून वर पाहील तर सगळेजण हसत होते. . . माझी विकेट पडली होती!!!

     साधारण 2 दिवसांनी त्यांचा पण पसंतीचा फोन आला. त्याच वीक मध्ये मला कैरोला निघायच होत त्यामुळे माझी गडबड होती म्हणून तुम्ही बोलणी करून घ्या फक्त फायनल निर्णय होण्यापूर्वी मला मुली ला भेटायचाय, त्यानंतरच आपला निर्णय द्या अस मी बाबांना सांगुन दिल.

     मला कैरो ला लगेच जायच होत त्यामुळे भेटायच कस हा प्रश्न होता कारण ती मुंबईत मी पुण्यात . . . भेटणार कस?? सुट्टी मिळणं पण अवघड. ह्या सगळ्यात शेवटी जाताना विमानतळावर भेटू या अस ठरवल.

     माझी सकाळी 9.00 ची फ्लाईट होती त्यामुळे पुण्याहून मी रात्रीच निघणार होतो. पहाटे 5.30 ला भेटू या अस नक्की झाल. ठरल्याप्रमाणे मी 5.30 मी टर्मिनल 2 ला पोहचलो. पण अजुन ही लोक काही पोहचली नव्हती. एकटी येते की सारा परीवार घेऊन येते, काय बोलू, काय विचारू,वेळेवर येईल का?? खूप सारे प्रश्न मनात येत होते.

     शेवटी 5.45 ला तिचा भाउ अन् ती आले अन् मी सुटकेचा निश्वास सोडला. चला आता तरी किमान मी बोलू शकेन अस वाटत होत. पण बाहेर उभ राहून कस बोलणार ?? म्हणून मी चेक इन करून तर ही दुसर्‍या गेट ने अरायव्हल ला येईल मग तिथे बोलू या अस सांगुन मी अरायवलला गेलो. तिथे जाउन पाहतो तर काय. . .तिथे मध्ये बॅरीकेड होत त्यामुळे. मी टर्मीनल 2 मधून अरायवल ला जाउ शकत नव्हतो. झाल पुन्हा एकदा पोपट!!!

     ती पलीकडे अन् मी अलीकडे अश्याच आम्ही गप्पा मारल्या. अन् त्या बॅरीकेडच्या साक्षीणेच मी तिला लग्नासाठी विचारल. आमच्या दोघांचा पण निर्णय झाला. तेवढ्यात तिचा भाउ सॅण्डविच घेऊन आला ते खाउन आम्ही निरोप घेतला.लगेच बाबांना फोन करून निर्णय देऊन टाकला. अन् त्यांनतर 2 आठवाड्याने आमच लग्न नक्की झाल.

     त्या दिवशी निघताना मी संदीप खरेचं " हे भलते अवघड असते. . . . " हे गान मी फील करत होतो. मुंबई विमानतळावरील तो अरायवल सेक्शन आम्ही दोघेपण कधीच विसरू शकणार नाही.

     हे कशे योगा योग असतात ना??? पाहा. . . मी नकार द्यायचा अस ठरवून गेलो होतो त्या मुलीलाच होकार दिला.अन् सर्वात महत्वाच सांगायच राहिलं, "मी मुंबईच्या मुलीशी कोणत्याही परीस्थीतीत लग्न करणार नाही अस ठरवल होत पण शेवटी मला मुंबईचीच मुलगी मिळाली." (समस्त मुंबईकर मुलींची माफी मागून. . .होणारी बायकोसुद्धा आली त्यात!!)

     चला अजुन 5 महिने तरी बॅचलर लाइफ जगून घेतो.!!!

--योगेश
(2009-12-30)
----------------

                   (साभार आणि सौजन्य-मनमौजी.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  -------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.09.2022-रविवार.