दवबिंदु-कविता-प्रेमात पडलो आहे मी…

Started by Atul Kaviraje, September 04, 2022, 09:21:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "दवबिंदु"
                                      ---------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "दवबिंदु" या ब्लॉग मधील "अनुवाद" या वर्गीकरणI-अंतर्गत  एक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "प्रेमात पडलो आहे मी..."

                           प्रेमात पडलो आहे मी...--
                          --------------------

आजकाल मी एकटा आहे कुठे
सोबत चालते आहे कोणी
तीची मला सवय होण्याची सवय आता झाली आहे
हे जे मिळाल आहे जेव्हापासुन तिची भेट झाली आहे
एक थोडया निरागसतेने हॄद्यावर हे संकट आल आहे

ऐक ना जरा...ऐक ना जरा...

हृद्याने सांगीतल आहे,तेवढच मला माहित ,
प्रेमात पडलो आहे मी..प्रेमात पडलो आहे मी...
तुच सांग ना आता

हे काय मला झाल आहे.....

दवबिंदुच्या थेंबात तु आहेस
मिटलेल्या डोळ्यात  तु आहेस
दहाही दिशात तु आहेस
तु आहेस फ़क्त तुच आहेस

हृद्याच शहर तु आहेस
चांगली बातमी तु आहेस
मोकळेपणातल हसण तु आहेस
आयुष्यात कमी होती ती तु आहेस

तु आहेस माझी
तु आहेस माझी
काही माहित नाही मला
हेच फ़क्त ठाउक आहे मला

प्रेमात पडलो आहे मी..प्रेमात पडलो आहे मी...

तुच सांग ना
हे काय मला झाल आहे.....

ढगांवर चालतो आहे मी
पडतो-सांभाळतो आहे मी
खुप इच्छा करतो आहे मी
हरवण्यापासुन घाबरतो आहे मी

जागलो ना झोपलो आहे मी
प्रवासी हरवलेला आहे मी
जरा डोक फ़िरलेला आहे मी
बुद्धु थोडासा आहे मी

हृद्याने काय करावे
हृद्याने काय करावे
तुझ्या विना...

एवढच मला माहित
प्रेमात पडलो आहे मी..प्रेमात पडलो आहे मी...

तुच सांग ना आता
हे काय मला झाल आहे.....

     हा आहे 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' सिनेमातल्या 'आय एम इन लव' हया गाण्याचा अनुवाद.हे गाण चित्रपटात नाहीये.निदान मी बघीतला त्यात तरी नाही.शिवाय प्रोमोजमध्येही कधी ते दिसलेल नाही.पण गाण एकदम अव्वल आहे.ते तुम्हा सर्वांपर्यत पोहोचवाचा हा माझा प्रयत्न,तर जरुर एका.सीडीत ते केकेच्या आवाजात आहे आणि कार्तिकच्या आवाजातही आहे.दोघांनीही गाण्याला योग्य न्याय दिला आहे.कार्तिकचा आवाज खुप प्रॉमीसिंग वाटतो आहे. परत एकदा सांगतो हया गाण्याला तेवढी प्रसिद्धी मिळालेली नसली तरी गाण खुप श्रवणीय आहे तेव्हा एकदा तरी ऐकाच...

     (हा विडियो खरच एकदा तरी पहा...सुंदर आहे एकदम गाण्यासारखाच..मुबंइतल्याच विनीता दास नावाच्या १९ वर्षाच्या मुलीने तो तयार केलेला आहे.)

-दवबिंदु
--------

                      (साभार आणि सौजन्य-दवबिंदू.वर्डप्रेस.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                     ---------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.09.2022-रविवार.