काय वाटेल ते…-अंतरंगातले मित्र..--लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 04, 2022, 09:25:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "काय वाटेल ते..."
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री महेंद्र कुलकर्णी "काय वाटेल ते..." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "अंतरंगातले मित्र.."

                             अंतरंगातले मित्र..--लेख क्रमांक-2--
                            ------------------------------

     "म्हणाला, माझे वडील इथे आले होते, आणि नंतर इथलेच होऊन राहिले. . पुन्हा एक पुस्ती जोडली, "हम मारवाडी जहां भी जाते है उस जगह कॊ अपना वतन बना लेते है" .

     या भागातल्या नक्षल टेररिझम बद्दल बोललो, तर म्हणाला की उल्फा वाले असो किंवा टेररिस्ट असओ , सगळ्यांचा फंडा एकदम एकच आहे,  इथला सगळा बिझिनेस हा मारवाडी समाजाच्याच हातात आहे.  हे उल्फा वाले एखाद्या गावात जाऊन एखाद्या मारवाड्याला सरळ गोळी मारतात आणि  दुसऱ्या दिवशी गावातल्या  इतर मारवाडी व्यावसायीकांनाही   निरोप पाठवतात, की जर जिवंत रहायचं असेल तर पैसे द्या...  पुलिस कुछ कर नही सकती.

     असा निरोप आला की आम्ही सगळे जिवाच्या भितीमुळे पैसे देऊन मोकळॆ होतो.  हम भी देते है.. "भैया फिअर इज द की".. पहले आदमी को जब कुछ कहे बगैर गोली मार दी , तो बाकी सब लोग पैसा दे ही देते है.. कोई किडनॅपिंग नही , कोई मारधाड नही. क्लिन गेम.. और हम बिझिनेस मन ही तो इझिएस्ट प्रे है इनके लिये.

     थोडा शॉक बसला.. पण  सावरलो. इथे लोकल असामी लोक फारच गरीब आहेत आणि खालच्या दर्जाची कामं करतात. थोडे फार लोक सरकारी नौकरी मधे आहेत. पण तशी परिस्थीती गंभीरच आहे. दुसऱ्या दिवशीचा म्हणजे त्याच्या फॅक्टरीला जाण्याचा प्लॅन करुन तो निघुन गेला. पण मला विचारात टाकुन... भारतामधला एक भाग.. ज्या बद्दल ना सरकारला काही काळजी आहे ना जनतेला.. तेंव्हा ह्या उल्फा च्या लोकांचं अघोषित राज्य आहे तिथे.

     ही परिस्थिती आसाम ची .. नागालँड बद्दल तर न बोललेलेच बरे! तिथली राज्य भाषा इंग्रजी. चेहेरा पट्टी मंगोलियन्स स्टाइलची , त्यामुळे ते  भारतीय असूनही परदेशी वाटतात. ते लोक तूम्हाल विचारतात, आप इंडीयासे आये है क्या...??  काय बोलणार? ह्या लोकांना पण ते  स्वतः भारतीय  आहेत असे वाटत नाही! ना शासनाचे लक्ष ना  कुठल्याही प्रकारे त्यांचे शासना मधे कॉंट्रिब्युशन  .

     काही कंपन्या आपले प्रॉडक्टस इथे विकायला तयार नसतात आणि विकले तरी वॉरंटी सर्विस मिळणार नाही असे स्पष्ट लिहिले असते वॉरंटी टर्म्स मधे. दोन वर्षापूर्वी क्रॉंप्टन ग्रिव्ह्ज च्या सर्व्हीस इंजिनिअरला किडनॅप करून काही लाखांची मागणी केली होती. कंपनीने पैसे दिले नाहीत म्हणून त्याला हाल हाल करून मारले . तेंव्हा पासून त्यांचं ऑफिस बंद करून टाकलं आणि तिथल्या इंजिनिअरला पण परत बोलावून घेतलं.

--महेंद्र कुलकर्णी
(January 31, 2009)
----------------------

                    (साभार आणि सौजन्य-काय वाटेल ते.वर्डप्रेस.कॉम)
                                  (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                   ---------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.09.2022-रविवार.