काय वाटेल ते…-अंतरंगातले मित्र..--लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, September 04, 2022, 09:27:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "काय वाटेल ते..."
                                   -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री महेंद्र कुलकर्णी "काय वाटेल ते..." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "अंतरंगातले मित्र.."

                             अंतरंगातले मित्र..--लेख क्रमांक-3--
                            ------------------------------

     गौहाती हा असा भाग आहे की त्या भागापर्यंत एखादी गोष्ट पोहोचवायची म्हणजे नॉर्थ बंगालला पुर्ण वळसा घालुनच जावं लागतं-मध्ये बांगला देश  असल्यामुळे. हे इतकं अंतर  रस्त्याने कापणं तसं   तसं अवघडच.. कारण सगळा हिमालयातला दऱ्या खोऱ्यात ला रस्ता.. पुण्याहून ट्रक निघाला तर कमीत कमी १० दिवस तरी लागणारच पोहोचायला. आणि पुन्हा प्रवासातले   इतर धोके आहेतच.  फक्त हेच टाळण्यासाठी तिथे त्याने जनरेटर्स असेंब्ली ची फॅक्टरी उघडली . केवळ इंजिन, अल्टरनेटर चे ट्रान्सपोर्टेशन केले आणि लोकल असेंब्ली केली तर ट्रान्सपोर्टेशन चा बराच खर्च वाचतो.

     दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज आला आणि म्हणाला, चलो सर आपकॊ माताजीके दर्शन कराता हु.. म्हणुन देवी ला गेलॊ . लहान गावातला फायदा म्हणजे, इतकी मोठी रांग असूनही मनोज च्या मुळे ५ मिनिटात दर्शन घेउन आम्ही बाहेर पडलो.

     डीजी सेट्स ची सिओपी  म्हणजे सेंट्रल पोल्युशन बोर्डाच्या माणसांकडुन कन्फर्मेशन ऑफ प्रॉडक्शन चे इन्स्पेक्शन असते, ते होते. आमच्या डीलर ची फॅक्टरी गौहाती पासून ३० किमी अंतरावर असेल . बरं कॅंपस पण अगदी रिझर्व पोलिस फोर्स च्या स्पेशल एरिया मधे. तिथे पोहोचताना जागोजागी बॅरियर्स लागले होते. शेवटच्या बॅरियर पासुन १०० मिटर अंतरावर त्यांची शेड असेल.

     मनोजचा फॅक्टरी इंचार्ज म्हणजे फुकन. हा एक लोकल माणुस. दिसायला अगदी  पक्का आदिवासी !  त्यामुळे जरी चांगले कपडे घातले असले तरीही त्याच्याकडे पाहिले की संशय   यायचा की हा उल्फा वाला तर नाही? बरं हे केवळ मलाच वाटलं असं नाही, दुपारी आम्ही जेंव्हा काझिरंगाला निघालो तेंव्हा प्रत्येक चेक पोस्ट वर याला खाली उतरवुन तपासणी करण्यात आली.

     त्याची कामाची तयारी पाहिली आणि तेवढ्यात शेवटच्या गेट जवळ मोठा फटाका फुटल्या सारखा आवाज आला. आम्ही जाउन पाहिलं तर सिक्युरिटी वाला जखमी होऊन पडला होता. गावठी बॉंब चा स्फोट झाला होता. सगळे खिळे , छर्रे इकडे तिकडे पडलेले दिसत होते. सिआरपिएफ ची  कॉलनी असल्याने ५च मिनिटात मिलिट्री पोलीस आले. नया आदमी कौन है म्हणून माझ्याकडे बोट दाखवून चौकशी सुरू झाली. पण मनोज ने सांभाळून घेतले.. माझं निसर्ग सौंदर्याने भारावलेले मन एकदम वास्तवात आलं आणि वाटलं  की  नकॊ हे सुंदर हिमालय, आपलं चिपचिप वातावरण असलेलं मुंबईच बरं..

     केवळ दोन दिवसांचा सहवास, पण मनोज एकदम  अंत रंगातला मित्र झाला होता. जेंव्हा कधी मुंबईला पाउस पडतो, किंवा २६/११ सारख्या प्रसंगी त्याचा फोन हमखास असतो. सब कुशल मंगल है ना?? असा सदा परिचित हसऱ्या आवाजात विचारतो. तसेच प्रत्येक सणाला एक एस एम एस ठरलेला.. आणि प्रत्येक वेळी फोन ठेवतांना म्हणणार... 'सरजी.. भाभीजी और बच्चॊको लेके जरुर जरुर आना."

--महेंद्र कुलकर्णी
(January 31, 2009)
----------------------

                  (साभार आणि सौजन्य-काय वाटेल ते.वर्डप्रेस.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 ---------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.09.2022-रविवार.