सुरुवात...दररोज काहीतरी नव-नवीन शिकण्याची...-वेळेचे नियोजन--लेख क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, September 04, 2022, 09:40:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                   "सुरुवात...दररोज काहीतरी नव-नवीन शिकण्याची..."
                  ------------------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री विशाल तेलंग्रे "सुरुवात...दररोज काहीतरी नव-नवीन शिकण्याची..."या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "वेळेचे नियोजन"

                         वेळेचे नियोजन--लेख क्रमांक-4--
                        ----------------------------

     वरील माइंड मॅपचे निरीक्षण करत असताना तुम्हाला प्रत्यय आला असेलच की बहुधा आपण बरेचदा महत्वाचे नसलेले व/वा तातडीचे नसलेले कामे प्रथम निवडतो, ती उरकल्यानंतर अगदी थोडा वेळ समाधान लाभते खरे, पण त्यानंतर अतिमहत्वाची व/वा तातडीची कामे हाताळताना मात्र आपला जीव मुठीत धरुन कुठल्याही परिस्थितीत ती पार पाडावीच लागतात. याचा परिणाम म्हणजे दिवस अखेर आपले मानसिक संतुलन बिघडते, व एकूणच परिस्थिती हाताबाहेर गेल्याची आपल्याला जाणीव होते. कॉव्हेच्या यावर मात करण्यासाठी सोपा उपाय सुचवतो तो असा—ही कामे १, २, ३, ४ अशा क्रमानेच करावीत, तुम्हालाही असेच वाटत असेल, नाही? तर मग लगेच २ x २ चा तक्ता असलेली अशी टू-डू लिस्ट बनवा व आपल्यापाशी असलेल्या अमूल्य वेळेचे योग्य रीतीने नियोजन करा!

                        काही टीपा:--

१. वरील माइंडमॅपवरुन एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की प्रकार ३ मधील अगदी आकस्मिक येऊन टपकणार्‍या कामाच्या (कामांच्या) ओझ्यामुळे जी अतिमहत्वाची कामे असतात, ती विसरली जाण्याचे चान्सेस फार जास्त असतात, तेव्हा जरा जपून!

२. सोमेश दादाने काही महिन्यांपूर्वी "पर्सनल डिझास्टर प्लॅन "चा माइंड मॅप बनविला होता, त्यामध्ये त्याने "लक्षात ठेव" या मुद्द्यामध्ये "स्वतःला कुठल्या ना कुठल्या कामात सतत व्यग्र ठेव" असे सांगितलेले आहे. पण वरील माइंड मॅप मध्ये मला ही गोष्ट इतर कामांचा प्रभाव बघता थेट ४ थ्या प्रकारात फेकावी लागली—यासंबंधी काही शंका असतील तर कळवाव्यात.

     असंच याबाबतीत आणखी माहीती मिळविण्याच्या उद्देशाने आंतरजालावर भटकत असताना [हा ] लेख वाचनात आला. वेळेचे नियोजन करीत असताना कॉव्हेच्या क्वाड्रंटपेक्षा अगदी तसाच पण जरा निराळा असणारा "केन ब्लेंचर्ड "चा क्वाड्रंट अधिक प्रभावी असू शकतो, असे प्रतिपादले आहे. या क्वाड्रंटचे साधारण स्वरुप खालील तक्त्यावरुन स्पष्ट होईल,

             तक्ता २: केन ब्लेंचर्डचे "फोर क्वाड्रंट मॅट्रिक्स"--

Want to do
Don't want to do
Have a to do

⟹   २

Don't have to do

⟹   ४

     वरील तक्त्याचे निरीक्षण केले असता असे दिसेल की आपण सामान्यतः १, ३, २ अशाप्रकारे कामांचा अवलंब करीत असतो. याचा परिणाम म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला करावयाची निकड नाहीये त्या पहिले केल्या जातात, उलटपक्षी ज्या करणे अतिशय निकडीचे आहे त्या गोष्टी मात्र अपूर्णच राहतात. ब्लेंचर्डच्या मते, यावर मात करण्यासाठीचा एकदम सोपा व सोयिस्कर उपाय म्हणजे १, २, ३, ४ या क्रमाने कामांचा अवलंब करणे.

     एक गोष्ट नेहमी लक्षात राहू द्यावी, ती म्हणजे—तुम्ही काहीही करु शकता पण सर्वकाही करु शकत नाही. (~ अनामिक)

                     अतिशय महत्त्वाची नोंद:--

     आत्ताच काही क्षणांपूर्वी[जानेवारी ३, २०११] सोमेश दादाने एक हृदय हेलावणारी खूप मोठी गोष्ट या लेखात दुरुस्त करायला सांगितली, ती म्हणजे—"रँडी पॉश् हे आता हयात नाहीत." :(
[त्यांच्या शब्दान्-शब्दाची खरी किंमत आता मला कळतीय. ही बाब हा लेख लिहिण्यापुर्वी वा लिहून पूर्ण झाल्यानंतर अद्याप मला माहित नव्हती. या अशा माझ्या चुकीबद्दल क्षमस्व. प्रस्तुत लेखात त्यांच्याबद्दल उल्लेख केलेल्या सर्व घटना गतकाळातील आहे, याची वाचकांनी शेवटी नोंद घ्यावी.]

     फेसबुकवर शेअर करा... फेसबुकवर शेअर करा.  आवडलं, मग ट्विटरवर ट्विटा! ट्विट करा.  तुमच्या गुगल रीडरला जोडा. गुगल रीडरला जोडा.

--विशाल तेलंग्रे
(रविवार, २ जानेवारी, २०११)
-------------------------

                (साभार आणि सौजन्य-विशाल तेलंग्रे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
               -----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.09.2022-रविवार.