मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-63

Started by Atul Kaviraje, September 07, 2022, 10:18:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  मला आवडलेल्या चारोळ्या
                                     चारोळी क्रमांक-63
                                 ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं-चारोळीकाराच्या  आईचे  स्थान  त्याच्या  हृदयात  आहे . बालपणापासून  ते  आतापर्यंत  तो  आपल्या  आईला  पहात  आलाय . तिच्याबरोबरचा  अनुभव  घेत  घेत  तो  मोठा  झालाय . तिची  ममता , तिचा  प्रेमळ  स्वभाव , तिची  महानता , तिचा  मोठेपणा  या  सर्वांचा  तो  अतिशय  जवळून  साक्षीदार  आहे . असे  प्रेम , अशी  ममता , अशी  माया  त्याला  जगात  दुसरीकडे  कुठेच  आढळली  नाही . ती  त्याला  फक्त  त्याच्या  घरात  आईरुपी  देवीकडून  अगदी  सहजगत्या  प्राप्त  झाली , मिळाली  असे  तो  आवर्जून , निक्षून  सांगतोय . सर्व  नाती-गोती  त्याच्यासोबत  आजही  आहेत , पण  हे  आईरुपी  नाते , एक  घट्ट , घनिष्ट , आपुलकीचे , जवळचे  अन  मैत्रीचेही , त्याने  कुठेच  अनुभवले  नाही .

     आणि  आईच्या  या  त्यागाची , तिच्या  मुलांप्रती  बलिदानाची  ओळख  जेव्हा  त्याला  पटली , तिच्या  खस्ता  खाणं , अनेक  त्रास  सहन  करणं , अथक  संकटांचा  मुकाबला  करणं , कठीण , बिकट  परिस्थितीशी झुंज  देऊन  मुलांना  मोठं  करणं , त्यांना  मार्ग  दाखवणं , समाजात  वावरण्यास  त्यांना  लायक  बनवणं , हे  फक्त  आईचं  करू  शकते , हे  जेव्हा  नवं-चारोळीकारास  उमगलं , समजलं  तेव्हापासून  त्याची  आईप्रति  निष्ठा , आईबद्दलचे  प्रेम  वाढू  लागलं . त्याला  आई  म्हणजे  काय  हे  समजले  होते . आणि  जेव्हापासून  त्याला  आई  समजू  लागली  होती , तेव्हापासून  त्याच्या  मनात  आईबद्दल  श्रद्धा , भक्ती  निर्माण  होऊ  लागली  होती , जी  वंदनीय  होती , अखंड  होती , अजोड  होती , अतूट  होती , अबाधित  होती .

     नवं-चारोळीकार  सश्रद्ध  होऊन  आईपुढे  झुकतोय , तिला  नमन  करतोय , तिला  नमस्कार  करतोय , आणि  गहिवरून  म्हणतोय , की  हे  आई , माझ्या  हृदयरुपी मंदिरात  मी  तुझीच  मूर्ती  जपली  आहे . त्या  ईश्वराचे  स्थान  मी  तुला  आज  दिलं  आहे . आजपासून  तूच  माझा  देव , तूच  माझी  देवता , तूच  सर्व-काही  आहेस . आजपासून  मला  देवळात  जाऊन  त्या  परमेश्वराचे  दर्शन  घेण्याची  गरज  नाही , कारण  माझे  देऊळ  हे  माझे  घरचं  झालंय . तुझ्या  चरणांशी  माझा  शत  शत  प्रणाम . तुला  मी  वाकून  नमस्कार  करतो . तुझे  चरण-तीर्थ  मी  प्राशन  करतो . तुझीच  या  घर-हृदय  मंदिरात  पूजा  करतो , तुझी  आरती  गातो , तुझे  गुण  गातो , तुला  भजतो , तुलाच  पुजतो . तुझे  कितीही  गुणगान  केले  तरी  ते  कमीच  पडतील , इतकं  तुझं  कार्य  महान  आहे . खरोखरच  आई  तू  धन्य  आहेस . तू  मला  मिळालीस , लाभलीस  म्हणून  मी नशीबवान  आहे , धन्य  आहे . प्रत्येक  जन्मी  तूच  माझी  आई  व्हावीस , आणि  मी  तुझा  मुलगा .

===============
हृदयरुपी  मंदिरात आई
तुझीच  आहे  मूर्ती ...
त्यात  तूच  माझा  देव ,
आणि  तुझीच  गातो आरती ...
===============

-- नवं-चारोळीकार
-----------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इन मराठी.इन)
                     ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2022-बुधवार.