आशिष सावंत-एक छोटीशी प्रेमकथा--क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, September 09, 2022, 09:22:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "आशिष सावंत"
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री आशिष सावंत यांच्या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "एक छोटीशी प्रेमकथा"

                            एक छोटीशी प्रेमकथा--क्रमांक-4--
                           -----------------------------

     ती म्हणाली, 'सकाळीच सहा वाजता सामान भरायला गाडी येईल आणि आठ वाजेपर्यंत निघुन जावू.' तसच जड अंत:करणाने आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
राजा सायकल वर सोडायला आला. बिल्डिंगच्या मागच्या गल्लीत उतरलो आणि राजाने इतका वेळ थांबून ठेवेलेले मन मोकळे केले. अगदी मनसोक्त रडला. मी फक्त त्याच्या पाठीवर थोपटत राहिलो दुसरे काय करू शकणार होतो. त्याच्या जागी जर मी असतो तर कदाचित मी काहीं वेगळे नसते केले. रडण्याचा भर ओसरल्यावर मी त्याला विचारले की तू जाणार आहेस का सकाळी? तो नाही म्हणाला. मला तिला सोडून जाताना बघवणार नाही.... 'अरे पण ती वाट बघत राहिली तर?' मी म्हणालो. 'नाही बघणार आणि वाट बघितली तरी ती समजून जाईल.' असे म्हणून त्याने खिशातली चिठ्ठी काढली आणि परत परत वाचत रडत राहिला.

     पुढचे ४/५ दिवस राजा क्लासला आलाच नाही. मित्राकडे विचारले तर म्हणाला कि राजा शाळेत पणा नाही आला होता.. कदाचित तब्येत बरी नाही. विचार केला आज संध्याकाळी त्याच्या घरी जाउन बघुया. क्लास सुटल्यावर त्याच्या घरी गेलो. हा शांतापणे चादर घेऊन गादी वर पडला होता. आई ने सांगितले, 'अरे दोन दिवसापासुन तब्येत बरी नाही. काही खातच नाही आहे. डॉक्टरांकडे घेऊन गेली तर ते म्हणाले काही झाले नाही...पण दिवसरभर झोपुनच आहे.' मी त्याच्या बेड जवळ गेलो, त्याच्या डोक्यावरची चादर खाली केली. गोरा चेहरा लाल लाल झाला होता. कदाचित घरातल्यांची नजर चुकवून खूप रडला असावा. उशी पण ओली झाली होती रडून रडून.
मी विचारले...काय झाले?
'काही नाही रे... तुला माहीत आहे ना.' राजा म्हणाला.
'तू गेला होतासा का तिला सकाळी निरोप द्यायला?'...मी
'हो गेलो होतो. पण तिच्या समोर नाही गेलो. झाडामागुनच बघत होतो. ती खूप शोधता होती रे मला. सारखी माझ्या बिल्डिंग कडे बघत होती तिला वाटले होते की मी येईन. मला समोर जायची डेरिंग च नाही झाली. कदाचित गेलो असतो तर मला रडणे थांबवता आले नसते. शेवटी ती गाडीत बसली. तेव्हा मी झाडामागून बाहेर आलो आणि गाडी चालू झाल्यावर तिला हात दाखवला. कारण ती गाडी थांबवू शकत नव्हती हे मला माहित होते' 'तिने मला व मी तिला शेवटचे बघितले आणी हात उंचावुन टाटा केला...तिने पण केला...डोळ्यात पाणी असल्यामुळे तिचा चेहराच बघू नाही शकलो रे. आता ती कधीच भेटणार नाही ह्याचे खूप दु:ख वाटतेय रे...मन नुसते तुटतयं, छातीत एक असह्य कळ येतेय. मी तिच्या समोर नाही आलो म्हणुन कदाचित रागावली असेल ना रे?'

     सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरुन गेला आणि हलकेच डोळ्यात पाणी उभे राहिले. मी चेहरा बाजुला करुन पाणी टिपले आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणालो, 'उद्या शाळेत जा, क्लासला यायला सुरवात कर जरा बरे वाटेल'. राजा मग पुढे एक आठवडाच क्लासला आला. तिच्या रिकाम्या जागेकडे बघुन ढसाढसा रडायचा. तिची खुप आठवण यायची म्हणुन त्याने क्लासच सोडून दिला. मला कधी कधी भेटायचा चेहर्‍यावरचे सर्व तेजच निघून गेले होते. हसणे तर विसरल्यातच जमा होते. पुढे त्याच्या वडिलांची पण बदली झाली आणि तो पुण्याला गेला. जाताना भेटूना गेला, म्हणाला, पुण्या पासून कोल्हापूर जवळ आहे, कधी तरी जाउन येइन. बघू नशिबात असेल तर भेट होईल.

     त्यानंतर तो कधी भेटलाच नाही. त्याचा काही फोन नंबर माझ्याकडे नाही आणि माझा त्याच्याकडे नाही. राजा आणि राणी दोघे ही कधी मला भेटले नाहीत. आता भेटली तरी मला ओळखताही येणार नाही. त्यांना मला ओळखता येणार नाही. जर ते दोघे ह्या इंटरेनेट जाला वर असतील आणि माझा ब्लॉग चुकून वाचतील तर बरे होईल. माझ्याशी संपर्क तरी करतील. मी अजुन तिथेच राहतोय. कधी येऊन अवश्य भेटा.

--आशिष सावंत
August 31, 2010
-------------------

                   (साभार आणि सौजन्य-आशिष सावंत.वर्डप्रेस.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  ---------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.09.2022-शुक्रवार.