कविता पावसाच्या-कविता-एकावन्नावी-पाऊस म्हणजे ?

Started by Atul Kaviraje, September 10, 2022, 10:46:55 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "कविता पावसाच्या"
                                     कविता-एकावन्नावी   
                                    -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! Paus kavita in marathi तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच.पाऊस कविता साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून rain poem in marathi माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi kavita उपलब्ध करून देत असतो.  मित्रांनो,या पोस्टमध्ये Paus kavita in marathi उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया rain poem in marathi मराठी कविता कडे.

                                     "पाऊस म्हणजे ?"
                                    -----------------

पाऊस म्हणजे
उल्हास मनी दाटलेला,
निसर्गाच्या सानिध्यात
मन वेडा फुललेला।

पाऊस म्हणजे
चौफेरे दाटलेली हिरवळ,
क्षणात दूर करते
मनात आलेली मरगळ।

पाऊस म्हणजे
उत्साह शरीरात दाटलेला,
रखडलेली कामे करण्यास
बोनस वेळ मिळालेला।

पाऊस म्हणजे
उगाच सुट्टी मिळालेली,
विसरून चिंता कामाची
कुटूंबासोबत घालवलेली।

पाऊस म्हणजे
चिखलाचाच राडा सारा,
उग्रट दर्प हवेत अन्
वाटेभर कचरा पसारा ।

पाऊस म्हणजे
नदिला आलेला पूर,
घरात साचलेलं पाणी अन्
मुलांच्या रक्षणाची हुरहुर।

पाऊस म्हणजे
फक्त पाऊसच आहे,
जितके लिहावं त्यावर
तितके कमीच आहे।

पाऊस म्हणजे
शब्दांची सरच बरसते,
खोलवर मनात रूतलेली
सहजच कविता खुलते।
🌦️🌩️🌧️🌦️🌨️⛈️☔🌧️☔🌦️🌨️⛈️🌧️🌦️

--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हेल्थ फ्लॅटर्स.कॉम)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.09.2022-शनिवार.