रविन्द्रायण-वाघोबाची मावशी-अ

Started by Atul Kaviraje, September 10, 2022, 10:28:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "रविन्द्रायण"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री रवींद्र लाकल यांच्या "रविन्द्रायण" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "वाघोबाची मावशी"

                                     वाघोबाची मावशी--
                                    ---------------

     नमस्ते , आज ब्लॉग कोणत्या विषयावर लिहावा हा विचार करत असताना मला अचानक माझा अत्यंत आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय आठवला तो म्हणजे 'वाघोबाची मावशी ' अर्थात मांजर .मांजर हा आमच्या घराचा अविभाज्य घटक आहे .मी जन्मल्यापासून तर मांजर आमच्या घरात आहेच पण त्याही आधी २० वर्ष म्हणजे जवळपास गेली ४० वर्ष मांजर माझ्या वडिलांचा आवडता पाळीव प्राणी असल्या कारणाने सतत आमच्या घरात आहे.

     आता पर्यंत कितीतरी मांजर आली आणि गेली पण आमच्याकडच्या मांजराचे नाव कधीही बदलले नाही जर मांजरी  असेल तर 'मनी' आणि बोका असेल तर 'बोक्या'. मी माझ्या आई आणि वडिलांकडून ऐकलेले (माझा जन्म होण्या आधीचे ) मांजराचे काही किस्से सुरवातीला लिहितोय .एक मांजर अस होत जे माझे वडील ऑफिस मधून   आले की टुणकन त्यांच्या खांद्यावर उडी घेत असे. आणि विशेष म्हणजे हे मांजर माझ्या वडिलांच्याच ताटात एका बाजूला काढून ठेवलेला भात किवा चपातीचा तुकडा खात असे आणि माझी आई दररोज त्याला बास्केट मध्ये ठेऊन फिरून आणत.
                                                                                                                               आता मी पाहीलेल्या पहिल्या मांजराबद्दल ते मांजर थोडस विचित्रच होत ते आश्या साठी  की तेंव्हा  मी दीड -दोन वर्षाचा असेन मी टीव्ही पाहत बसलेला असताना (टीव्ही पाहण्याची आवड मला लहानपणापासून आहे हे यावरून दिसत ) ते मांजर अचानक मागून येऊन त्याच्या पुढच्या दोन पायाने माझ्या मानेला धरून मला  मागे डोक्यावर पाडत असे (ही अतिशयोक्ती वाटत असली तरी हे खर आहे ) आणि हे मांजर सश्या सोबत चक्क खेळत असे . पुढे माझ्या वडिलांची दुसऱ्या गावाला बदली झाली आणि ते मांजर तिथेच राहीले.

     नंतर ही आम्ही अनेक मांजर पाळली आणि त्यांना पिल्ले देखील झाली . त्यातल्याच एका पिल्लाला लहान असताना पहिले काही महिने मागच्या दोन पायावर चालता येत नसे पण नंतर काही दिवसांनी कोणत्याही विलाजाशिवाय ते मांजर व्यवस्थित चारही पायावर चालू लागले .त्याच्या आईच्या चाटन्यानेच बहुतेक ते  बरे झाले असIवे.

     आणखी एका बोक्याचा अतिशय मजेदार अनुभव आहे . तो बोक्या मी पहिलीत असताना आमच्या घरी होता मी तीन चाकी सायकल वर बसून शाळेत जात असे आणि माझी आई मला शाळेत सोडायला  यायची तर माझ्या आई सोबत तो बोक्या देखील मला शाळेत सोडायला यायचा तो माझ्या   सायकल समोर गडबडा लोळत येत असे आणि मला शाळेत सोडल्यावर माझ्या आई सोबत माघारी येत असे . एकदा हा बोकोबा काही माघारी माझ्या आई सोबत आलाच नाही . मग जेव्हा माझी आई मला शाळेतून माघारी नेण्यासाठी आली तेव्हा हा बोक्या बरोबर माझ्या शाळेच्या दारात बसला होता व तो पुन्हा माघारी घरी आला. ह्या बोक्याच आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे  हा बोक्या त्याच्या आईच्या अनुपास्तितीत आपल्या धाकट्या भावंडांची अगदी आई सारखी काळजी घेत असे .

--रवींद्र लाकल   
(रविवार, ८ मे, २०११)
-------------------

                   (साभार आणि सौजन्य-रविन्द्रायण.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  ---------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.09.2022-शनिवार.