मराठी चित्रपट-सरसेनापती हंबीरराव-सात दौडले सात उधळले सात झुंजले

Started by Atul Kaviraje, September 11, 2022, 10:18:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, श्री प्रवीण तरडे यांचा, सध्या गाजत असलेला मराठी चित्रपट "सरसेनापती हंबीरराव", या  ऐतिहासिक चित्रपटातील एक वीरश्रीपूर्ण गीत. या गाण्याचे बोल आहेत- "सात दौडले सात उधळले सात झुंजले"

     बहलोल खान स्वराज्यावर चाल करून आला होता. महाराजांचा राज्याभिषेक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला होता आणि त्यात आडकाठी करण्यासाठी म्हणूनच औरंगजेबाचा बहलोल खान नावाचा सरदार मराठी मुलुखावर चालून आला होता.

     'बहलोल खानास धरावे किंवा मारावे किंबहुना मारावेच ।' असा स्पष्ट आदेश असतानाही सरसेनापती प्रतापराव गुजर बहलोल खान शरण आला म्हणून त्याला जीवदान देतात. पण स्वराज्यावर चालून आलेला कुठलाही शत्रू पुन्हा एकवार स्वारी करतोच हे महाराजांना माहीत होतं त्यामुळे बातमी कळताच महाराजांचा संताप होतो. तडक दुसरं एक खरमरीत पत्र सारसेनापतींच्या तळावर विजेसारखं येऊन थडकतं.

     'हे तुम्ही काय केलेत? खानाच्या तलवारीने कापली गेलेली जनता आपल्याला कधीही माफ करणार नाही' हे महाराजांच्या तोंडून निघालेले शब्द पत्रात वाचून प्रतापरावांना चूक लक्षात येते. आणि जराही विचार न करता ते बहलोल खानावर तुटून पडण्याचा निर्णय घेतात. केवळ सहा गडी मावळे घेऊन आहे त्या परिस्थितीत बहलोलखानाच्या छावणीकडे कूच करतात. एवढया प्रचंड छावणीसमोर सात शूरवीर मावळ्यांना काय टिकाव लागणार? पण महाराजांचे 'बहलोल खानाला मारल्याशिवाय रायगडी तोंड दाखवू नका' हे शब्द त्यांच्या मस्तकात घर करून बसतात.

     चित्रपटात हा प्रसंग बघताना आपण भावनिक होतो. उत्तम एरियल चित्रीकरण कसे असावे ते ह्या गाण्यातून लक्षात येतं. सात तगडे घोडे आणि त्यावर स्वार सात तगडे मावळे बघून अभिमान वाटतो. सह्याद्रीच्या हिरव्यागार मैदानांतून उधळलेले घोडे बघतानाचा अनुभव चित्रपटगृहात जाऊनच घ्यावा.

     ह्या विहंगम दृश्याला साथ मिळते ती जाळ पेटवणाऱ्या गाण्याची. 'सातही ताऱ्यातून उल्कापात' घडत असताना असंच संगीत असायला हवं. संगीत ऐकताना धमन्यातून रक्त सळसळत असतानाच प्रचंड धुळीचे लोट उठतात आणि सरदारांना रणांगणात पावन करून सात घोडे फक्त माघारी येताना दिसतात तेव्हा मनाला खूप वाईट वाटतं. पण दिग्दर्शकाच्या ह्या प्रसंग मांडणाच्या हातोटीला मानलं पाहिजे.

                           "सात दौडले सात उधळले सात झुंजले"
                          ----------------------------------

सात  दौडले  सात  उधळले  सात  झुंजले 
सात  क्षात्र  समरात
सात  दौडले  सात  उधळले  सात  झुंजले 
सात  क्षात्र  समरात

सातही  ताऱ्यातून  उल्कापात
कडकड  करे  उन्हात  दामिनी  पात

हर  हर  हर  महादेव  गरजतो 
सरसेनापती  प्रताप
सरसेनापती  प्रताप
शब्द  झेलण्या  राजाचा 
सर  साथ  निघाले  सात

सात  दौडले  सात  उधळले  सात  झुंजले 
सात  क्षात्र  समरात
सात  दौडले  सात  उधळले  सात  झुंजले 
सात  क्षात्र  समरात

सातही  ताऱ्यातून  उल्कापात
कडकड  करे  उन्हात  दामिनी  पात

खदिरांगासम डोळे रोखुनी
दोधारी  समशेर  परजुनी
उरी  धगधगता  राज-खलिता
तळहातावर  प्राण  घेउनी
हा  सैन्य-समुद्र  प्याया  हे
अगस्ती  दौडले  सात
शब्द  झेलण्या  राजाचा 
सर  साथ  निघाले  सात
शब्द  झेलण्या  राजाचा 
सर  साथ  निघाले  सात

बहलोलIची  खोड  मोडण्या
राज्याभिषेकी  विघ्न  तोडण्या
प्रताप  जे  कुड्तोजी  घुसले
हिसा  पिळोजी  विठ्ठल  भिडले
सिद्धी  विठोजी  कि  बोलले
हर  हर  महादेव
निनाद  घुमला  तो  पहा  गगनात
सात  दौडले क्षात्र ते समरात
सात  दौडले  सात  उधळले  सात  झुंजले 
सात  क्षात्र  समरात

सातही  ताऱ्यातून  उल्कापात
कडकड  करे  उन्हात  दामिनी  पात

सातही  ताऱ्यातून  उल्कापात
कडकड  करे  उन्हात  दामिनी  पात

=========================
क्रिएटेड बाय  - उर्विता  प्रोडूकशन्स
प्रेसेंटेड बाय  - संदीप  मोहिते  पाटील 
रिटन आणि डिरेक्टड  बाय :  प्रवीण  विठ्ठल  तरडे
प्रोड्युसड बाय  - शेखर  मोहिते  पाटील ,
                   सौजन्य  निकम  आणि  धर्मेंद्र बोरा
डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी  - महेश  लिमये
एडिटर  - मयूर  हरदास
सॉंग : सात  दौडले 
मूवी  : सरसेनापती  हंबीरराव   
आर्टिस्ट नाव : प्रवीण  विठ्ठल  तरडे
गायक  :  आनंद  शिंदे
संतिकार :  लेफ्टनंट  नरेंद्र  भिडे
गीतकार  : लेफ्टनंट प्रणित  कुलकर्णी
=========================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.09.2022-रविवार.